काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल...
नितीन फुलझाडेचिखली : जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंस्कृत व सभ्य शहर म्हणून चिखलीचे उदाहरण दिले जायचे. चिखलीत फक्त निवडणुकीपुरते राजकारण असायचे. आता मात्र चिखली शहरात विकृतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कमळाचा गळ हा नागरिकांसाठी फास झाला आहे. चिखलीत विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा खकाणा जिकडे - तिकडे दिसत आहे. चिखली शहरातील नगरपालिकेची ही निवडणूक संस्कृती विरुध्द विकृतीची लढाई आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा सभ्येता व संस्कृतीचा विजय असेल. काशिनाथ आप्पाच्या मापात पाप नसून ते शहराच्या सभ्येतेचे व संस्कृतीचे संवर्धन करतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी व्यक्त केला.
बुधवार १९ नोव्हेंबर रोजी चिखली नगरपालिकेच्या नगरअध्यक्ष पदाचे मविआचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचाराचा नारळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांच्या सुख – दु: खात धावून जाणारे नगरसेवक, नगरअध्यक्ष असतात. मविआचे सर्व उमेदवार २४ तास जनसेवेसाठी कटिबध्द असणारे आहेत. महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून हीच आपल्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags
राजकीय
