‘मराठा आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन’च्या स्नेहसंमेलनात आमदार श्वेता महाले पाटील व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती....
नितीन फुलझाडे
बुलडाणा:- मराठा समाजातील व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मराठा आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन (MEA)’ करत असलेले उपक्रम उल्लेखनीय असून, या माध्यमातून नवउद्योजकांना दिशा मिळत आहे, असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले.त्या ‘एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026’ निमित्त आयोजित मराठा समाजातील व्यावसायिकांच्या स्नेहसंमेलनात बोलत होत्या.या कार्यक्रमास माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात मराठा समाजातील व्यावसायिक एकत्र येऊन अनुभव, व्यवसायविस्ताराच्या संधी, तसेच आगामी इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 संदर्भातील माहिती यावर सखोल चर्चा झाली. मराठा व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी एमईए कार्यरत असून, या संस्थेच्या सर्व उपक्रमांना आपल्या पातळीवरून पूर्ण सहकार्य देऊ, असे आश्वासन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी यावेळी दिले.
या स्नेहसंमेलनाचा मुख्य संदेश “एकत्र येऊ, पुढे जाऊ!” असा देण्यात आला असून, मराठा व्यावसायिकांच्या संघटित प्रगतीच्या दिशेने हे स्नेहसंमेलन एक प्रेरणादायी पाऊल ठरले
या स्नेहसंमेलनास एमईए चे अध्यक्ष श्री. विक्रम गायकवाड,श्री अंकुशराव पडघान,श्री. आश्रम काळे, श्री. सचिन भांबरे, श्री. राजेश्वर उबरहंडे, श्री. अनिल कर्हाडे, श्री. अर्जुन बोरसे सर, श्री. ज्ञानेश्वर तळेकर, श्री. रूपराव उबाळे, श्री. संजय शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते...
