श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट
नितीन फुलझाडे
चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला गती देणाऱ्या श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ना. श्री. आकाशदादा फुंडकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन सूतगिरणीच्या कार्याचा आढावा घेतला.
या प्रसंगी मंत्री महोदयांचे सूतगिरणीच्या व्यवस्थापनातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. सूतगिरणीच्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी टप्प्यांची सविस्तर माहिती मंत्रीमहोदयांना देण्यात आली.जिनिंग, प्रेसिंग व स्पिनिंग या तिन्ही प्रक्रिया एकत्र असणारा हा बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प असून, सहकाराच्या माध्यमातून शेतकरी उद्धाराचा संकल्प येथे साकार झाला आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून सुमारे 500 लोकांना प्रत्यक्ष तर हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या कार्याबद्दल मंत्री आकाश फुंडकर यांनी समाधान व्यक्त करत, “सहकाराच्या माध्यमातून जनतेचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग उभा राहू शकतो,” असे प्रतिपादन केले.
ही सूतगिरणी आमदार सौ. श्वेता महाले पाटील व त्यांचे वडील श्री. अंकुशराव पडघान यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून, तसेच श्री. विद्याधर महाले (स्वीय सचिव, मुख्यमंत्री महोदय) यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली उभी राहिली आहे.या सूतगिरणीच्या माध्यमातून महाले दाम्पत्याकडून अधिकाधिक जनसेवा व चिखली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडावा, अशा शुभेच्छा कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांनी दिल्या.या प्रसंगी श्री. विद्याधरजी महाले, श्री.ऋषभ पाटील, तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर यांची उपस्थिती होती.
