Khabarbat news- आदर्श विद्यालय चिखली येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 चे उद्घाटन संपन्न

 


नितीन फुलझाडे 

चिखली:- स्थानिक आदर्श विद्यालय येथे  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या अभियानाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे यांच्या हस्ते तसेच सचिव प्रेमराज भाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य  सतीश गव्हले ,उपप्राचार्य भगवानराव आरसोडे, पर्यवेक्षक श्रीपाद दंडे, लक्ष्मीकांत शेटे, प्रकाश तायडे उपस्थित होते. 
          सदर अभियान व्यवस्थितपणे राबविण्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे तसेच सचिव प्रेमराज भाला यांनी विद्यालयातील शिक्षक सुधीरजी शेटे, गणेशजी अंभोरे, प्राध्यापक सुनील काकडे यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सोबतच सदर अभियानामध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना संस्थेचे सचिव प्रेमराज भाला यांनी उपस्थित सर्व अधिकारी तथाशिक्षक कर्मचारी यांना दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे यांनी याहीपूर्वी झालेल्या अभियानामध्ये आपल्या शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि आता येणाऱ्या या अभियानामध्ये आपण शंभर टक्के प्रथम क्रमांक मिळवू अशी आशा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्रीपाद दंडे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक लक्ष्मीकांत शेटे यांनी केले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक प्राध्यापक कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. 
Previous Post Next Post