नितीन फुलझाडे
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास...
चिखली:-शहरातील जुन्या मेहकर रोड परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर उपजीविकेचे संकट निर्माण झालेल्या व्यापाऱ्यांनी आज चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नगरपरिषदच्या तत्कालीन प्रशासकांच्या आदेशानुसार झालेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडला होता.उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर या व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणींसह आज आमदार ताईंना भेट दिली.
बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या अडचणी व्यक्त केल्या. “जिथे वर्षानुवर्षे व्यवसाय केला, ते ठिकाण अचानक गेले.आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला,” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. अनेक व्यापाऱ्यांनी “या कठीण काळात आमचा आवाज कोणी ऐकला नाही, पण आमदार ताईंनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले,” असे सांगत समाधान व्यक्त केले.
व्यापाऱ्यांना आश्वस्त करताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले की शहरातील विकास आराखड्यानुसार लहान व्यवसायिकांसाठी पर्यायी जागा, नियोजित हॉकर्स झोन तसेच पुनर्वसनाच्या शक्यता प्रशासनासमोर ठोसपणे मांडल्या जातील. तसेच गरज भासल्यास लघुउद्योग व कौशल्य-विकास योजनांच्या माध्यमातूनही मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “तुमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही; शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहोत,” असे आमदार ताईंनी स्पष्ट केले.
या संवेदनशील भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये आमदार महाले पाटील यांच्याबद्दल आदर व विश्वास अधिक दृढ झाला आहे. भाजपच्या विकासाभिमुख धोरणामुळे आणि आमदार ताईंच्या कार्यशैलीमुळेच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. “विकासाच्या प्रवासात आमचाही सहभाग सुरक्षित राहील, याची हमी भाजप देऊ शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जुन्या मेहकर रोडवरील व्यापाऱ्यांनी केलेला पक्ष प्रवेश हा केवळ राजकीय निर्णय नसून अडचणीत सापडलेल्या शेकडो कुटुंबांसाठी नव्या आशेचा आधार ठरल्याचे मत स्थानिकांमधून व्यक्त केले जात आहे....
या वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री. पंडितदादा देशमुख, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. पंजाबराव धनवे, श्री. उद्धव वाघ, श्री. शिवाजी वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या सोहळ्यात सर्वश्री गजानन अंकुशकर, अंकुश लोखंडे, सुरेश वावधने, अजय वावधने, सय्यद गाजी, दौलत खान, अस्लम खान, सय्यद इरफान, शेख हामिद, शेख शोएब, अल्तमश बागवान, जावेद, शेख महबूब शेख हबीब, एजाज खान, कदीर खान, जावेद खान, अ. मुजाहीद अ. सत्तार, रामेश्वर शेळके, रामदास मोरे, रोहन मोरे, शोहेब हमीद शेख, भारत खरात, नदीम भाई, नईम भाई, जावेद लोहार, शेख वसीम, शे. नदीम, शेख अकबर, बिस्मिल्ला, रहमान खान, जाहेद, शेख अजीम शेख नजीम, महबूब मेकॅनिक, प्रशांत जाधव, शेख वसीम, शेख शोएब, शेख जहांगीर, मोहम्मद मुश्ताक, सय्यद इमरान, शेख इमरान शेख युनूस, शेख युनूस शेख आमद, रियाज खां महबूब खां, मजीद खां महमूद खां, शेख जाकीर शेख शब्बीर, शेख रिजवान शेख अखतर, शेख साबीर शेख अन्वर, अमजद खान, जावेद यांनी भाजपात प्रवेश केला.
