डोअर टू डोअर मोहिमेत सौ. प्रतिभा कांबळे अग्रस्थानी — मतदारांमध्ये उत्साहाची लाट
चिखली - चिखली नगर पालिका निवडणुक २०२५ प्रभाग क्रमांक ३ (अ) मधील निवडणुकीचे राजकीय वातावरण चरमसीमेवर असताना शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रतिभा छोटू कांबळे यांच्या प्रचाराला मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. डोअर टू डोअर जनसंवादाद्वारे त्यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनात ठसा उमटवला असून परिसरात “प्रतिभा कांबळेचीच लाट” असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
नव्या उत्साही नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेत नागरिक ठाम असल्याचे चित्र असून सध्या जनतेमध्ये एकच चर्चा आहे.
“काम करणाऱ्यांना मत, गप्प बसणाऱ्यांना घरात!”
जनतेने यावेळी निवडणुकीचे सूत्र स्वतःच्या हातात घेतले असून “वर्षानुवर्षे आश्वासने देऊन गायब होणाऱ्या नेत्यांना यंदा चोख उत्तर देणार” अशीच तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
“एकदा निवडून आल्यानंतर चेहरा न दाखवणाऱ्यांना यंदा कायमचे बसवू” असा संतप्त सूर मतदारांमध्ये उमटत आहे.
प्रभागातील युवक वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून “जनतेत राहून लोकांची कामे करणारा नेता हवा” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला जात आहे. सौ. प्रतिभा छोटू कांबळे या नव्या युवा चेहऱ्याला व्यापक पाठिंबा मिळत असल्याने प्रभाग ३ (अ) मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत हा प्रचार आणखी वेग घेणार असून या निवडणुकीत प्रभाग ३ (अ) मध्ये इतिहास घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
