Khabarbat News- भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड पाठिंबा.. विरोधकांचे धाबे दनानले..!

 


नितीन फुलझाडे 


चिखली दुमदुमली महारॅलीने.. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, 

चिखली:- नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आज प्रभाग 10 मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाची प्रचार रॅली काढण्यात आली. सुरुवातीला साध्या रॅलीच्या रूपात सुरू झालेली ही मोहीम, नागरिकांच्या प्रचंड सहभागामुळे क्षणोक्षणी विस्तारत जाऊन महारॅलीत परिवर्तित झाली. चिखली मध्ये निघालेल्या या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असून चिखली मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार भाजपाचे निवडून येतील अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.


रॅलीची सुरुवात भगवान बुद्ध, संत व महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून करण्यात आली. पुढे सरकत असताना घराघरातून नागरिक, माताभगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत राहिले आणि प्रभाग 10 चा संपूर्ण परिसर घोषणांनी, उत्साहाने दुमदुमून गेला.


या महारॅलीत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मा. श्री. पंडितदादा देशमुख, तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. रेणुका भुतेकर आणि श्री. भारत पवार यांच्या प्रचारार्थ नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून उत्स्फूर्त साथ दिली.


चिखलीच्या परिपूर्ण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन रॅलीतून करण्यात आले. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना आमदार सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या,

"पंडित दादा देशमुख हे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, मनमोकळे आणि मोठ्या मनाचे जननेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात चिखली नगरपरिषद भाजपामय करा आणि तुम्हाला विकासाचा मोठा झंझावात अनुभवायला मिळेल. नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकून सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे."


प्रभाग 10 मधील आजची महारॅली पाहता, आगामी निवडणुकीत मतदार केवळ भाजपासोबत असल्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे....

Previous Post Next Post