Khabarbat News- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज इंग्लिश काॅन्व्हेंटमध्ये वनराई वाचन कट्टा




नितीन फुलझाडे 

अकोला:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज इंग्लिश कॉन्व्हेंट, बोथाकाजी येथे विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वनराई वाचन कट्टा चा शुभारंभ श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव भुईभार व वनराई चे अकोला जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या अभंगवाणीचे सादरीकरण   मृणाली उकर्डे, भक्ती गावंडे, श्रेया टिकार, स्वरा कर्डेल, प्राप्ती कर्डेल, मायावती इंगळे, शिवन्या बोरसे, कृष्णाली बावस्कार, ईशान्वी खंडारे यांनी केले. 

   कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व अभिवादनाने झाली. यावेळी गुरुकुंज इंग्लिश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनींच्या श्री गुरुदेव बालिका भजनी मंडळाने राष्ट्रसंतांची अभंगवाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

      यानंतर आयोजित बाल वक्तृत्व संमेलनात विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य, ग्रामगीता, स्वच्छता, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर  मृणाली उकर्डे, श्रीयोग पाचपोर,  ईशान्वी खंडारे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले.

   या कार्यक्रमात वनराई च्या वतीने वनराई पर्यावरण वाहिनीची स्थापना करण्यात आली. वनराई चे अकोला जिल्हाध्यक्ष   बबनराव कानकिरड यांच्या हस्ते या उपक्रमाची घोषणा  करण्यात आली.मुख्याध्यापक सागर उकर्डे यांनी प्रास्ताविक केले.

       गजानन राऊत सर्वोदय संस्था प्रतिनिधी , सुरेश गव्हाळ  वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य , गणेश दादा जंजाळ केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा बुलढाणा जिल्हा सेवा अधिकारी, ह. भ. प. रवींद्र महाराज, मध्यवर्ती प्रतिनिधी गुरुकुंज आश्रम मोझरी, गणेश वरुडकर जिल्हा कार्यकारणी सदस्य,  विनोद गुरव  संजय पारखेडे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रल्हाद अप्पा उकर्डे , तुषार गावंडे , केशव भाऊ पेसोडे  , राजेश टिकार ,भास्कर पाटेखेडे , दिगंबर  कोकाटे , दिगंबर पाटेखेडे , मनोहर आप्पा उकर्डे, गुलाबराव रिंढे  पांडुरंग तुंबडे , वैजनाथ आप्पा उकर्डे, मधुकर भगत, पुरुषोत्तम घुले , शेख अब्दुल्ला शेख मलंग  उपस्थित उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान तुंबडे पोलीस पाटील यांनी केले.

Previous Post Next Post