नितीन फुलझाडे
अमरावती :
विदर्भातील सर्वात मोठी व प्रतिष्ठित अशी अमरावती हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात पार पडली. या आठव्या राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन डायरेक्टर दिलीप पाटील सर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले होते.
स्पर्धेचा शुभारंभ आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर व सचिव डॉ. विजय गावंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाला.
या मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, तहसीलदार संतोष काकडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली व बुलढाणा तालुक्यांतून तब्बल १५० धावपटूंनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट संघभावना, तयारी आणि धावपटूंच्या जिद्दीच्या बळावर मागील वर्षाप्रमाणे यंदाही चिखली संघाने अमरावती हाफ मॅरेथॉन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकत विजेतेपदावर पुन्हा मोहर उमटवली.
चिखलीतून २१ किलोमीटर अंतरासाठी सहभागी झालेल्या प्रमुख धावपटूंमध्ये —
महेश महाजन, अनिल काळे (मामा), सुनिल मोडेकर, तहसीलदार संतोष काकडे, नंदकिशोर पिसे पाटील, अनिल गाडे, राजेश बाहेकर, संतोष रिंढे, नाना सपकाळ, विष्णू सोळंकी, भागवत सरनाईक, राजेश झाडगे, कैलास ठेंग, गणेश धांडे, अभिजित बोंद्रे, पि एस इंगळे, संदीप मुंडे, संतोष जाधव, दीपक कदम, रामा सोनुने, रमेश काळे व प्रमोद टेहरे बबन लांडगे, पराग तांगडे, डॉ. भागवत पाटील, सागर डहाळे, दिनेश भोजवाणी, डॉ. आश्विन भवर व बुलढाणा रणरागिणी ग्रुपच्या महिला सदस्य यांचा समावेश होता.
या सर्व धावपटूंनी आपल्या परिश्रम, समर्पण व संघभावनेच्या जोरावर चिखलीचा झेंडा पुन्हा एकदा अमरावतीच्या भूमीवर अभिमानाने फडकावला. या कामगिरीमुळे चिखली परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
