उद्या नगरपरिषदांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत

 


 

नगरपरिषद कार्यालयात सोडत कार्यक्रमाचे आयोजन

 नितीन फुलझाडे 

बुलडाणा, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका): महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण) आदेशानुसार जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयात काढण्यात येणार आहे.

 

ही आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यानुसार उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा आणि चिखली या नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तर  उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड डराजा आणि देऊळगाव राजा नगरपरिषद,  उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर आणि लोणार नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी खामगांव यांच्या अध्यक्षतेखाली खामगांव आणि शेगांव नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या अध्यक्षतेखाली जळगांव जामोद नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या अध्यक्षतेखाली नांदुरा आणि मलकापूर नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत अनुक्रमे सकाळी ११ व दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

 

यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

Previous Post Next Post