संस्थेचे सभासद आणि ग्राहक पुरस्काराचे मानकरी- दीपक देशमाने
नितीन फुलझाडे
चिखली:- शहरात सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन करून विश्वास, पारदर्शकता व ग्राहकसेवा हे संस्थेचे प्रमुख ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, अत्यंत कमी कालावधीत आपला नावलौकिक निर्माण करणाऱ्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला आज गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक) येथे रविवार, दि.१२ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या भव्य समारंभात फेडरेशनचे अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष संजय होसमट यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. २२ वर्षांच्या अविरत प्रवासात संस्थेने आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली या पुरस्कारामुळे बुलडाणा जिल्ह्याचा सहकार क्षेत्रातील मान अधिक उंचावला आहे.
राज्यामधील पतसंस्थेची पुरस्कारासाठी निवड करतांना त्याकरिता असलेले सर्व निकषांची पूर्तता करीत, ग्राहकांची बदलती गरज ओळखत तत्परतेने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला अमरावती विभागातील पाच जिल्ह्यामधून सलग चौथ्यांदा अव्वल दर्जा प्राप्त करून बुलडाणा जिल्ह्याचा सहकार क्षेत्रामध्ये मान उंचावत हा बहुमान प्राप्त केलेला आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री काकासाहेब कोयटे यांनी गौरवोद्गार काढत म्हटले कि श्री मुंगसाजी महाराज पतसंस्था ही सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ आहे पारदर्शक कार्यसंस्कृती आणि सामाजिक बांधिलकीमुळे ती संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे आणि या यशाची पावती म्हणून संस्था सतत पुरस्कृत होत आहे. मागील २२ वर्षामध्ये संस्थेचा आर्थिकदृष्ट्या प्रगतीचा उंचावलेला आलेख यासह संस्थेची उल्लेखनीय वाटचाल दिवसागणिक प्रगतीचा वाढता आलेख, वाढती लोकप्रियता संस्थेची जनसामान्यांच्या प्रति असलेली तळमळ, महिलांच्या आर्थिक, सामाजिक शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी असलेले कार्य सामाजिक दायित्व म्हणून गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्धर आजार शस्त्रकीया करण्यासाठी केलेली आर्थिक मदत सोबतच अतिशय सामान्य व समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठीची संस्थेचे राबवीत असलेले धोरण, विकासात्मक कार्य करण्याची पद्धत याची राज्य फेडरेशन ने विशेष घेतलेली दखल पुरस्काराच्या रुपात सलग चौथ्यांदा झालेला सन्मान हि संस्थेसाठीच काय संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच बाबी प्रेरक ठरतात. अशा प्रेरणादायी श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात पतसंस्थेला एक आदरात्मक नवी ओळख मिळाली असून संस्थेच्या ग्राहकांच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे व विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थक्रांतीचे नवे धोरण अवलंबून आर्थिक उत्कर्ष कसा साधावा याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून खर्या अर्थाने या पुरस्काराने सन्मानित करतांना विशेष आनद होत असल्याचे यावेळी फेडरेशन चे सन्मानीय अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले.
पतसंस्थेच्या या दैदिप्यमान प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर असणारे संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखानिहाय सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी भागधारक, ग्राहक व संस्थेप्रती जिव्हाळा असणारे संस्थेचे सर्व हितचिंतक यांचा सिहाचा वाटा असल्याने खर्या अर्थाने हे सर्व या पुरस्काराचे मानकरी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष श्री दीपकभाऊ देशमाने यांनी व्यक्त केले.
संस्थेचा आजरोजी संपूर्ण जिल्हाभर आपल्या शाखेंचा विस्तार असून त्यामध्ये १. साखरखेर्डा, २. उदयनगर , ३. राऊतवाडी चिखली, ४. पेठ, ५. दे. माळी, ६. सिद्खेड राजा, ७. मेहकर, ८. एकलारा, ९. जानेफळ, १०. सुलतानपूर, ११. वर्दडी १२. देऊळगाव राजा १३. किनगाव राजा १४ बीबी १५ कळंबेश्वर १६. देऊगाव मही १७. डोणगाव अशा संस्थेच्या सतरा शाखा अतिशय चांगल्या प्रकारे नफ्यात चालू आहे. लवकरच संस्थेच्या आणखी काही शाखा जनसेवेत कार्यान्वित होणार असून लवकरच हि संस्था राज्य स्तरावर कार्यान्वित झाल्याचे आपणास दिसेल. आपल्या शाखेंचा विस्तार करतांना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आधुनिक अर्थक्रांती द्वारे आर्थिक क्षेत्राला बळकटी देण्याचे काम संस्था करत आहे. त्यादृस्टीने संस्थेने चिखली शहरामध्ये व संस्थेच्या अन्य शाखेवर बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला असून, जवळपास ५०० च्या वर बचत गटांना कर्ज वाटप केलेले आहे. त्या योगाने अनेक महिला व पुरुष बचत गटांमार्फत दुग्द्जन्य व अन्य लहानमोठे उद्योग सुरु करून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. असे प्रतिपादन यावेळी संस्थाध्यक्ष दीपकभाऊ देशमाने यांनी व्यक्त केले.
दीपस्तंभपुरस्कार वितरण सोहळ्याला आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री दीपकभाऊ देशमाने सहपरिवार उपस्थित होते.
