नितीन फुलझाडे
चिखली:- शहरातील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस पक्षाचे मुस्लिम समाजातील प्रमुख नेते श्री. शहजाद अली खान यांनी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाने वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाचा केवळ राजकीय वापर केला; पण त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमच्या पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे आज मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर भाजपकडे आकर्षित होत आहे.” असे उद्गार यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी काढले.
या प्रवेशामुळे चिखली शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी शहजाद अली खान व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी सागर पुरोहित (शहराध्यक्ष भाजप),संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष भाजप), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुका अध्यक्ष), अंकुशराव पाटील,शेख अनिस भाई, शैलेश बाहेती,हाजी हनीफभाई, नईम सौदागर,सलीम परवेज, शैलेश देशमुख,राम बनसोडे, नज्जू भाई, प्रशांत बापू देशमुख,शैलेश सोनुने, अमोल सुरडकर, सुरेश इंगळे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.

