नितीन फुलझाडे
चिखली - शहराच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबर 2025 रोजी महाराणा प्रतापप्रेमी युवकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे "हिंदुसुर्य दिपोत्सव" साजरा केला.
चिखली शहराच्या मध्यस्थानी शूरवीर हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा आहे चिखली बस स्थानकासमोरील हिंदूसूर्य महाराणा प्रताप मार्केट परिसरात मोठमोठ्या इमारती आहेत व दिवाळी सणानिमित्त या इमारतीवर आकर्षक अशी लाइटिंग टाकून विद्युत रोषणाई केली जाते . हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दिवाळी सणांमध्ये सर्वत्र झगमगाट दिसतो व पुतळा परिसरात मात्र पाहिजे त्या प्रमाणात विद्युत रोषणाई दिसत नसल्यामुळे महाराणा प्रताप प्रेमी युवकांनी एकत्रित येऊन दिपावली सणाच्या सुरुवातीलाच सामूहिक लोकवर्गणीतून या ठिकाणी अतिरिक्त विद्युत रोषणाई केली आणि दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एकत्रित येऊन शेकडो पणत्या लावून सामूहिकपणे "हिंदूसूर्य दिपोत्सव" साजरा केला . यावेळी समाधान गाडेकर,शिवदास राजपुत रामा रिसॉर्ट, बद्रीनाथ महाले, हरिभाऊ परिहार अध्यक्ष व्यसनमुक्ती संस्था, बंटी सुरडकर, गजानन परिहार रंगोली मोबाईल अँड फोटो स्टुडिओ,शीतल राजपूत (अध्यक्ष पद्मावती महिला ग्रुप ),गजानन जाधव अध्यक्ष गणराज्य फाउंडेशन,सोमेश इंगळे
श्रीकांत सोळंकी ,प्रणव गाडेकर (एकम्य बिल्डर),
गोपाल गाडेकर,उमेश इंगळे,गणेश इंगळे,पंकज सोळंकी,तन्मय राजपूत व महहराणा प्रतापसिंह प्रेमी उपस्थित होते.
