शाळा सर्वांगसुंदर करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा - प्राचार्य वसंतराव गाडेकर*

 




 जिल्हा परिषद हायस्कूल  मंगरूळ नवघरे येथे १५ वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक गेट टुगेदर संपन्न 

नितीन फुलझाडे 

चिखली:- आपली शाळा सर्व भौतीक सुविधांसह सर्वांगसुंदर बनविण्यासाठी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा व यथाशक्ती मदतीचा हात देऊन  जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच शिकवावे आणि गावचा विकास साधावा व आपल्या  गुरुजनांना हीच बाब गुरुदक्षिणा म्हणून समर्पित करावी असे भावनिक आवाहन गेट टुगेदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले आहे .

    याबाबत असे की , जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ नवघरे येथे सन २००९-१० मध्ये दहावी शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन( गेट-टुगेदर ) कार्यक्रम  शनिवारी 25 ऑक्टोंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांचे मार्गदर्शनानुसार  शाळेचे माजी प्राचार्य डी . टी . फोलाने सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते .

    या स्नेहमिलन  कार्यक्रमाला शाळेची माजी विद्यार्थीनी तथा बुलडाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ . मनिषाताई पवार ह्या प्रामुख्याने  उपस्थित होत्या . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या  शाळेच्या आजी - माजी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्याकडून कृतज्ञातापूर्वक सत्कार करण्यात आला . यामध्ये प्रामुख्याने गणेशपूरचे मुख्याध्यापक रमेश वाघ सर , जी . एस . वायाळ सर , जी . एम . वाघ सर , पी . टी . डुकरे सर ,  चिखलीचे मुख्याध्यापक एस .यु . मोरे सर , एच . ई . डोंगरे सर , डी . एस . खरात सर , एल . एच . सरोदे सर , एस . जी . पाटील सर , विजय मिसाळ सर  , एस . जी .लोखंडे सर, ए पी .वानखेडे सर , एस .एस .रिंढे सर, परमेश्वर सुर्वे सर , गजानन  गोसावी सर, रमेश धोंडगे सर , पी आर वानखेडे सर, आर . ई .शेळके सर, दत्तात्रय वांजोळ सर ,   रामेश्वर तोंडे सर , व अलका थेटे (माजी कर्मचारी ) यांची प्रमुख उपस्थिती  लाभली.

     सर्वप्रथम माता सरस्वती,राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार घालून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व तब्बल पंधरा वर्षानंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिल्यानंतर शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच सर्व शिक्षकांना सन्मानित केले. 

      याप्रसंगी शिक्षकांमधून जी . एम . वाघ , एच .ई .डोंगरे , एल . एच .सरोदे, ए . पी .वानखेडे यांनी तर माजी विद्यार्थ्यां मधून जि . प . च्या माजी अध्यक्षा सौ . मनिषाताई पवार , गोपाल आंभोरे , महेश महाजन , अश्विनी वाकडे यांनी मनोगत व्यक्त केले . 

    या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उमेश मु-हेकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश महाजन  यांनी केले. या कार्यक्रमासाठी सन 2009- 10 चे   माजी विद्यार्थी  वंदना गलबले, उर्मिला म्हळसणे, भाग्यश्री म्हळसणे, वर्षा म्हळसणे,कामिनी मावळे,सोनिया काळे, रूपाली ढोणे, आरती भोजने,जयश्री शिंदे,वंदना बोरकर,सुलोचना बोरकर, अश्विनी अंभोरे,वैशाली दांदडे, माया वाकोडे ,अश्विनी वाकडे, प्रिया आढाव, शितल पठाडे , सविता तायडे,नंदा जाधव,गोकुळा गोजरे,माधवी वाकोडे, प्रियंका जाधव,लक्ष्मी खरात,वर्षा तायडे, वर्षा बोरकर,मीना गवई, जयश्री येळवंडे, दिपाली वाळोकर, उमेश मुऱ्हेकर, समाधान येळवंडे , जुबेर खाँ सलीम खाँ पठाण , शेख इसराईल शेख इब्राहिम , शेख अतिक शेख यासीन , नागेश जोरवार , सदानंद पठाडे , सागर गाडे , दत्ता वाकडे , देवानंद कठाळे , दत्ता पानगोळे, कुलदीप जाधव , मदन जाधव , सतिश जाधव ,  निलेश जाधव , विकास जाधव , वैभव ढोणे ,  पांडूरंग ढोणे , सतिश मुंढे , संदीप मुंढे , वैभव म्हळसणे , विशाल सपकाळ , विशाल बोरकर , रोशण बोरकर , स्वप्नील गोजरे,अमोल बोरकर , शत्रुघ्न आंभोरे, सचिन आमले , अंकुश भगत , दिलीप सुरडकर , योगेश दांदडे , महेश महाजन, महेश घरमोडे यांचेसह माजी विद्यार्थी उपस्थित होते .

Previous Post Next Post