चिखलीत ओबीसी समन्वय समितीचे हजारोंच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन

 





चिखली (जि. बुलढाणा) :
ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, विविध प्रलंबित मागण्यांसाठी व शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी चिखली तहसील कार्यालयासमोर ओबीसी समन्वय समिती चिखली शाखेच्या वतीने भव्य एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा झाले होते. समाजाच्या हक्कांवर कुठलाही गदा आल्यास गप्प बसणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनातून स्पष्ट झाली. “आम्ही एकजुटीने आहोत, आमच्या हक्कांवर कुणाचाही डल्ला चालणार नाही,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
आंदोलनादरम्यान शासनाकडे खालील मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या –
1️⃣ दिनांक 2 सप्टेंबर रोजीचा ओबीसी समाजाविरोधातील अन्यायकारक शासन निर्णय (GR) तात्काळ रद्द करावा.
2️⃣ ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करून समाजाची खरी वस्तुस्थिती सरकारसमोर आणावी.
3️⃣ महाज्योती संस्थेला अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणेच समप्रमाणात निधीची तरतूद करावी, जेणेकरून ओबीसी विद्यार्थ्यांना व युवकांना समान संधी मिळेल.
निवेदन सादर
आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनाला ओबीसी समाजातील मान्यवर तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सुभाष देव्हडे, सतीश शिंदे, विजय खरात, अभय तायडे, विठ्ठल गंगे, राहुल चवरे, दीपक देशमाने (राजे), अशोक हिरवे, अशोक इंगळे, नानाभाऊ सपकाळ, मोहन मेहेत्रे, सचिन भराड, प्रशांत जैवाळ, विलास घोलप ,राकेश चोपडा, अनमोल ढोरे, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, राजेश देशमाने, अंबादास खरात, नितीन फुलझाडे, यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post