राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिखली नगराचा श्री विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन

 








या विजयादशमीला संघ स्थापनेला 100 वर्ष झाले पूर्ण 

नितीन फुलझाडे 

चिखली नगराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव शनिवार दि.04 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक तालुका क्रीडा संकूलच्या  मैदानात उत्सव संपन्न होणार आहे.  या उत्सवासाठी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय संघठण मंत्री  मा.श्री.अतुलजी  जोग,मुंबई हे लाभणार आहेत. यावेळी चिखली येथील योग प्रशिक्षक मा.श्री.प्रविणजी पडघान  हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या उत्सवात नगरातील तरुण व प्रौढ स्वयंसेवकांचे विविध शारिरीक प्रात्याक्षिक, घोष वादन, सांघिक गीत, सुभाषित,अमृतवचन नंतर प्रमुख पाहुण्याचे मनोगत व वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवासाठी महिन्याभरापासून स्वयंसेवकांची तयारी सुरु आहे.

या उत्सवाला चिखली नगरातील सर्व नागरिक -माताभगीनी तथा युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर कार्यवाह मिलिंदजी हिवाळे यांनी केले. पाऊस असल्यास कार्यक्रम शि.प्र.म.च्या सभागृहात होईल याची नोंद घ्यावी.








Previous Post Next Post