नितीन फुलझाडे
चिखली : दि.14 ऑक्टोबर 2025 ला सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात समर्थ गोपाल देशमाने याने तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) प्राप्त केले, तसेच 19 वर्षाखालील गटात ओम संतोष नवले याने 6 वा क्रमांक प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.या खेळाडूंचे बुलढाणा क्रीडा संयोजक मनोज श्रीवास्तव सर यांनी मेडल प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.तसेच विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल शि.प्र.मं.चे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे,सचिव प्रेमराजजी भाला सर्व संचालक मंडळ,प्राचार्य गव्हले सर,उपप्राचार्य आरसोडे सर,पर्यवेक्षक दंडे सर,शेटे सर,तायडे सर सर्व शिक्षक,कर्मचारी बंधू भगिनींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष गुळवे व होमराज कोळी यांनी मार्गदर्शन केले.