नितीन फुलझाडे
चिखली:- येथील आर्यनंदी अर्बन पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा,श्री सुरेशआप्पाजी खबुतरे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन चिखलीचे आराध्य दैवत रेणुकामाता,खटकेश्वर महाराज, संस्थेचे श्रद्धास्थान आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमाचे पुजन प्रमुख पाहुणे मा.श्री, विजयजी शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष - भाजपा तथा मा.आमदार बुलडाणा, मा,श्री राजेंद्रजी व्यास साहेब, अध्यक्ष व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट,मा,श्री, राजाभाऊ खरात मा, नगराध्यक्ष चिखली मा,श्री सुभाष बारसकर सर धाड तालुका संघचालक,तथा सेवानिवृत्त शिक्षक, मा,श्री.अशोकसेठ अग्रवाल,मा,श्री.सुनिलजी लाहोटी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर सहकार आणि राजकीय व हितचिंतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
व संस्थेचे अध्यक्ष सुरेशआप्पाजी खबुतरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,
सत्कारानंतर मा,श्री विजयराजजी शिंदे साहेब व राजेंद्रजी व्यास साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आर्यनंदी पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष मा,श्री. सुरेशआप्पाजी खबुतरे यांनी त्यांच्या मनोगतात संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला ते म्हणाले
राजकारण आणि सहकार क्षेत्र हे परस्परांशी जोडलेले आहेत, जिथे राजकीय हस्तक्षेप सहकार संस्थांच्या कामकाजावर परिणाम करतो, ज्यामुळे संस्थांची स्वायत्तता कमी होऊ शकते आणि काहीवेळा ध्येये विसरली जातात. आदर्श परिस्थितीत, सहकार क्षेत्राने राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम केले पाहिजे, जेणेकरून ते सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधू शकेल. व कर्जदारांनी सुद्धा नियमित कर्ज भरणा करुन संस्थेला सहकार्य केले पाहिजे आणि कर्जदाराने स्वतःची सुद्धा प्रगती संस्थेच्या माध्यमातून झाली पाहिजे बॅक तुम्हसाठीच आहे.ही संस्था जनतेची त्यांच्या गरजांची पुरर्तता पुर्ण करणारी आहे.
यावेळी संस्थेच्या प्रगतीत उत्कृष्ट सेवाबद्द्ल ज्योतीताई भोपळे (कॅशियर) तसेच संस्थेचे अल्पबचत प्रतिनिधी दिपक आहुजा, प्रभाकर सावंत यांचा सन्मान मा,विजयराज शिंदे साहेब यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला.
व संस्थेचा वार्षिक अहवाल संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र गायकवाड यांनी वाचुन दाखवला.
आमसभेचे सुत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष विजयजी खरात सर यांनी तर आभार प्रदर्शन रुपेशसेठ वायकोस यांनी केले.
यावेळी संस्थेचे संचालक शिवाजीराव बनसोडे, प्रकाश गुंजकर, अमोल खबुतरे, संतोष देशमुख, अतुल धनलोभे, निलेश सोळंकी, नलिनी वायकोस, कौशल्याबाई शिंगणे,आश्विनी मेहेत्रे, सर्व सल्लागार मंडळी व इतर सभासद,ठेविदार, हितचिंतक उपस्थित होते.
व आमसभेच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले व अल्पोपहाराने सभेची सांगता झाली.
