“स्वदेशी वस्तूंच्या विक्रीला प्राधान्य द्या” – चिखली किराणा असोसिएशनचे सचिव कैलास भालेकर यांचे आवाहन

 



लोकल टू वोकल – भारताचा जगाला ठाम संदेश

Nitin fulzade 

चिखली:- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेनुसार चिखली किराणा असोसिएशनचे सचिव कैलास भालेकर यांनी व्यापारी व ग्राहक वर्गाला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

             भालेकर म्हणाले की, “आज जागतिक पातळीवर काही महासत्ता राष्ट्र भारताविरुद्ध विविध षडयंत्रे रचत आहेत. अतिरिक्त कर लावणे, भारतीयांना नोकरीतून कमी करणे अशा कुरापती करून भारताच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तूंच्या विक्रीस प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.”

         ते पुढे म्हणाले की,“येणाऱ्या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी भारतात निर्मित वस्तूंच्या विक्रीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ग्राहकांनीही खरेदी करताना स्वदेशी वस्तूंनाच प्राधान्य द्यावे. या उपक्रमातून जागतिक महासत्तांना भारताचा ठाम संदेश जाईल आणि *‘वोकल फॉर लोकल’*चा नारा अधिक बळकट होईल.”

            भालेकर यांनी अधोरेखित केले की,“आज देश प्रत्येक क्षेत्रात स्वदेशी निर्मितीवर भर देत आहे. त्यामुळे देशांतर्गत रोजगार निर्मितीला चालना मिळत असून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग अधिक मजबूत होत आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना स्वदेशी वस्तूंबाबत जागरूक केले पाहिजे. ग्राहकांनीही देशभक्तीची भावना जपत स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाच्या आर्थिक सामर्थ्यासाठी व स्वाभिमानासाठी स्वदेशी वस्तूंचा प्रसार वाढवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”

Previous Post Next Post