चिखलीत शिवसेेनेचे तहसिलदारांना निवेदन

 



सरसकट पिकविमा व ओला दुष्काळ जाहिर करा

नितीन फुलझाडे 

चिखली :
शिवसेना युवासेना, किसानसेनेच्यावतीने चिखली तालुक्यात शेतकर्‍यांना सरककट पिक विमा मिळावा, तसेच मंडळनिहाय नव्हे तर सरसकट ओला दुष्काळ जाहिर करावा. यासाठी तहसिलदार यांच्या दालनात शिवसेना पदाधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. पिक विमा मिळत असतांना कोणाला कमी, तर कोणाला जास्त, तर कोणाला काहीच नाही. यामध्ये तफावत आढळून येत असल्याचे पुरावेच तहसिलदार यांना सादर करण्यात आले. तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहिर करावा, व श्रावण बाळ योजनेचे रखडलेले प्रकरणे निकाली काढण्यात यावे. व बंद पडलेला राशनचा माल पैसे स्वरुपात न देता सरळ राशन वितरण करण्यात यावे. यासाठी चिखली शिवसेना,युवासेना, किसानसेना यांच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी  सर्व शिवसेना, युवासेना, किसानसेना, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post