नितीन फुलझाडे
चिखली:- तालुक्यात दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेलया अतिवष्टीमुळे तलाठी व कृषीसाहयक यांच्याकडून झालेल्या शेतक-यांच्या शेतातील पिकाचे नुकासानीचे सर्वेक्षण करून, सर्वेक्षण याद्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात यावे अशी मागणी युवा सेना वि.प्रमुख शिवाजी शिराळे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीच्या सर्वेक्षण करून सदर याद्या ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात याव्या याबाबत केंद्रीय मंत्री भूमिपुत्र खा. प्रतापराव जाधव यांनी सूचना केल्या होत्या,मात्र अनेक ठिकाणी अशा याद्यांचे वाचन झाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असल्याने, खा.प्रतापराव जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय यांच्या सूचनाप्रमाणे वाचन होत नाही. तरी आपल्या अधिनस्त सर्व तलाठी व कृषी सहाय्यक यांना ग्रामसभेत नुकसानग्रस्त शेतक-यांचे यादीचे वाचन करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच शेतक-यांची नुकसानीबाबत कोणतीही तक्रार येणार नाही व आल्यास तिचा ताबडतोब मित्रा करावा याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रतिलिपी केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खा.प्रतापराव जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख,शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, शिवसेना नेते काकडे साहेब, कुटे सर,अनिल जाधव, समाधान जाधव, अनमोल ढोरे, आशुतोष हाडे, दीपक गरड, राम देशमुख,विनोद वानरे,राकेश चोपडा,पवन चिंचोले, राजू गायकवाड, नारायण गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

