नितीन फुलझाडे (खबरबात न्यूज)
चिखली:-आदर्श विद्यालय येथील गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, जिल्हा उपविभागीय अधिकारी शरद पाटील,आमदार श्वेताताई महाले पाटील चिखली तहसील तहसीलदार संतोषजी काकडे , चिखली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संग्रामजी पाटील, चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांतजी बिडगर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय संचालक मंडळ, माझी नगराध्यक्ष सुहास दादा शेटे,शिवसेना नेते कैलास भालेकर, प्रामुख्याने प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यांचे सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य भगवानराव आरसोडे ,पर्यवेक्षक श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे, लक्ष्मीकांत शेटे, उपस्थित होते. सदर मिरवणुकीमध्ये वर्ग 5 ते 12 यांनी देखावे सादर केले.
