चिखलीत उपजिल्हा रुग्णालयात अपंग बोर्ड सुरु

 



आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश

चिखली (प्रतिनिधी) :
चिखली तालुक्यातील अपंग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता चिखली उपजिल्हा रुग्णालयात अपंग बोर्डची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे अपंग प्रमाणपत्राकरिता जिल्हा स्तरावर धावाधाव करण्याची गरज उरणार नाही. रोजगार, शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय योजना, प्रवास सवलत, पेन्शन आदी शासकीय सुविधांसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आता थेट चिखलीतच मिळणार आहे.

या निर्णयामागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांचे विशेष परिश्रम असून, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी पत्र देऊन ही मागणी केली होती. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची जाणीव ठेवून तात्काळ सेवा सुरू करण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे.

स्थानिक अपंग बांधवांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, “आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी दाखवलेल्या सकारात्मक पुढाकारामुळेच आज ही सुविधा चिखलीत उपलब्ध झाली,” अशा भावना व्यक्त होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडघान यांनी चिखली ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सुरू झालेल्या नव्या उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये आरोग्य शिबिर, डायलिसिस युनिट, नव्याने मंजूर करण्यात आलेले अपंग बोर्ड तसेच महिलांसाठी सुरु झालेल्या सोनोग्राफी सेंटरचा समावेश आहे.

या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सैय्यद उमर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामानंद इंगळे, डॉ. उमेश सावजी, डॉ. अंकिता सावजी, नोडल ऑफिसर डॉ. किशोर गवई, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल काळुसे, तसेच डॉ. दीपक भगत, डॉ. धनंजय परिहार, डॉ. राहुल राजपूत, डॉ. एन.जे. गायकवाड, डॉ. दीपाली भारसवडकर, डॉ. आरिफ बेग, डॉ. प्रदीप मेहेत्रे, डॉ. रश्मी खर्चे, डॉ. प्रीती रिंढे, डॉ. नेहा अवचार यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मुख्य अधिपरिचारिका प्रीती चव्हाण व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

चिखली उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली ही नवी सुविधा अपंग बांधवांच्या आयुष्यात दिलासा व आशेचा किरण ठरणार आहे.
Previous Post Next Post