निताताई सोळंकीं व इतरांनी केली मतदारसंघाच्या विकासासाठी प्रार्थना..
चिखली (प्रतिनिधी) :
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा होत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज चिखली शहरातील आई रेणुका माता मंदिर परिसर तसेच जुनेगाव येथील राम मंदिर येथे महिला मोर्चाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचे मार्गदर्शन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले असून, मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश यातून देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्षा महिला मोर्चा सौ. निताताई सोळंकी यांनी प्रतिपादन करताना सांगितले की, “भारताला मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कल्पक, सक्षम व द्रष्टे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या कार्यकाळात महिला भगिनींसह सर्व समाजघटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघालाही आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विकासाची गती लाभत आहे. या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी भगवंताकडे प्रार्थना करते.”
या प्रसंगी सौ. सुनीताताई भालेराव (जिल्हा उपाध्यक्ष), सौ. सिंधुताई तायडे (जिल्हा सरचिटणीस), सौ. अर्चनाताई खबूतरे (जिल्हा सचिव), श्रीमती सुनंदाताई शिनगारे (जिल्हा सचिव), श्रीमती नितांताई जैन (जिल्हा उपाध्यक्ष), सौ. कविताताई मुळे, सौ. छायाताई खरात यांच्यासह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
