*रस्ता सफाई मशीन द्वारे शहर स्वच्छतेवर भर- प्रशांत बिडगर*

  



*नगर परिषद चिखली आरोग्य विभागाचा शहर स्वच्छतेस पुढाकार*


*नितीन फुलझाडे*
 *चिखली:- नगरपरिषद चिखली द्वारे नेहमीच शहरात वेगवेगळे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतात. शासनाच्या विविध सूचनांप्रमाणे तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी विविध स्वच्छता विषयक कार्यक्रम व "स्वच्छ भारत अभियान" नगरपरिषद चिखली द्वारे व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येते. अशातच आपल्या मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषद चिखलीच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात अद्यावत ७१२ वाहनावरील रस्ता सफाई मशीन(रोड व्हॅक्युम स्वीपर मशीन) व ट्रॅक्टर वरील रस्ता सफाई मशीन दाखल झाली आहे. या मशीनद्वारे शहरात विविध ठिकाणी 11 सप्टेंबर पासून मुख्य मार्गावरील धूळ व कचरा सफाई अभियानास सुरुवात झाली आहे. या अद्यावत मशीनद्वारे चिखली शहर धुळमुक्त व "स्वच्छ चिखली सुंदर चिखली" होण्यास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया नगरपरिषद चिखलीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी व्यक्त केली आहे. तसेच नगरपालिका आरोग्य विभाग नेहमीच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असतो.नव्याने आलेल्या अद्यावत रस्ता सफाई मशीनद्वारे शहरातील मुख्य रस्ते धुळमुक्त,स्वच्छ व चकचकीत राहणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद चिखलीने या मशीन द्वारे शहर धुळमुक्तीकडे एक पाऊल टाकले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व बालकांना होणाऱ्या श्वसनाच्या विकारांमध्ये कमी येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे*
Previous Post Next Post