सहभागी होण्याचे वृषालीताई बोंद्रे यांचे आवाहन
चिखली : हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. हिरकणी परिवारासोबत गरबा उत्सव साजरा करण्यासाठी
गरबा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणार असून, यात सर्व वयोगटातील उत्साही महिला व युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे.
या कार्यशाळेत ३१ वर्षांचा अनुभव असलेले सुप्रसिद्ध कोरिओग्राफर नितीन सर, अमरावती हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत ३०० पेक्षा अधिक पारितोषिके पटकावली आहेत.कार्यशाळेत दुपारी ३ ते ५, सायं. ६ ते ८ , अशा दोन बॅचेस राहणार आहेत. सहभागी होण्यासाठी शुल्क ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कार्यशाळा महाराणा प्रताप इनडोअर स्टेडियम, अनुराधा नगर, साकेगाव रोड, चिखली येथे पार पडणार आहे.अधिक माहितीसाठी
9403057325, 9130658407, 8149906050, 9922073123, 9421396516, 7875020272, 7385226553, 7397907580, 8668819923 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
