शिवसेनेचे चिखली पोलिस स्टेशनला विविध समस्यांचे निवेदन

 


चिखली :
चिखली जाफ्राबाद रोडवरील पळसखेड दौलत भागात अनेक अनोळखी व्यक्ती वास्तव्यास येत आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ते कोणत्या भागातील रहिवाशी आहेत? त्यांचे आधारकार्ड तपासण्यात यावेत, कारण बर्‍याच दिवसांपासून परिसरात मुक्या जनावरांची चोरी वाढलेली आहे. मंदिराच्या दानपेटींच्या सुध्दा चोर्‍या झालेल्या आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी चिखली शिवसेना, युवासेना,  किसानसेना यांच्यावतीने चिखली पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी  सर्व शिवसेना, युवासेना, किसानसेना, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post