नितीन फुलझाडे
चिखली:- स्थानिक आदर्श विद्यालयात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणपती विसर्जनाच्या दिवशी आदर्श विद्यालयातून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक हे संपूर्ण चिखलीकरांसाठी एक पर्वणी असते. आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी निघलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये तब्बल 67 देखावे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले .या प्रबोधनात्मक तसेच चालू घडामोडी वर आधारित देखाव्यांनी चिखलीकरांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे आदर्श विद्यालयातून निघणारी ही भव्य गणपती विसर्जन मिरवणूक राज्यातील सर्वात मोठी शालेय गणेश विसर्जन मिरवणूक आहे.
आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून सदर मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. सदर मिरवणुकीमध्ये वर्ग एक ते बारा असे एकूण 67 समाज प्रबोधन पर देखावे सादर करण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, जिल्हा उपविभागीय अधिकारी शरद पाटील,आमदार श्वेताताई महाले पाटील चिखली, तहसीलदार संतोषजी काकडे , चिखली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संग्रामजी पाटील, चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांतजी बिडगर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय संचालक मंडळ, प्रामुख्याने प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यांचे सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य भगवानराव आरसोडे ,पर्यवेक्षक श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे, लक्ष्मीकांत शेटे, उपस्थित होते.
सदर मिरवणुकीमध्ये वर्ग 5 ते 12 यांनीखालील प्रमाणे देखावे सादर केले....
झाडे लावा झाडे जगवा, बोले की बारात, स्वच्छता अभियान, इको फ्रेंडली श्री गणेशा, पोतराज, मी एक थेंब पाण्याचा, गजानन महाराज दिंडी, विठ्ठल दर्शन, हर घर तिरंगा, महाराष्ट्रातील संत दर्शन, बालकृष्ण दर्शन, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, जगा आणि जगू द्या, प्रयागराज, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरणाचा भस्मासुर, धर्म रक्षक संभाजी राजे, याला जबाबदार कोण, या पक्षांनो परत या, मतदार जागा हो, एक पेड मा के नाम, संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव, इको फ्रेंडली गणपती, छत्रपती संभाजी महाराज, राधा, अवयवदान जीवनदान, tariff वार, महाराष्ट्रातील सण उत्सव, दिंडी सोहळा, स्वदेशी आपणाव देश बचाओ, जाळे चिकन रोड खेळाचे, ये प्रयागराज है, ऑपरेशन सिंदूर, रेणुका देवी वाहन महोत्सव, शहीद जवानांना श्रद्धांजली, यल्लमा देवीच्या जोगव्यातून समाज प्रबोधन, सौर ऊर्जा काळाची गरज, तुलसी दिंडी ओणम, राधाकृष्ण दर्शन, श्री छत्रपतीचे गड किल्ले, पंच परिवर्तन, मिशन परिवर्तन इत्यादी देखावे सादर केले.
सदर देखाव्यामध्ये विद्यालयातील 3500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आदर्श विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सदर मिरवणुकीमध्ये देखाव्याचे क्रमांक काढून दाखवला पारितोषिक दिल्या जाते. मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण चिखली मध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. चिखलीतील गणेश मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच खाऊचे वाटप केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस जाहीर केले. यावर्षीच्या गणेशोत्सवाचे पूर्ण संचलन आदर्श विद्यालयातील गणपती प्रमुख सुधीरजी शेटे, विकासजी जाधव, प्राध्यापक रमेश जगताप यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श विद्यालयाचे अधीक्षक विनायक भालेराव यांनी केले