जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार

 




गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्य विक्रीवर बंदी



 नितीन फुलझाडे 

बुलढाणा, दि. 2 (जिमाका) :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात आगामी अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जन या दिवशी कोरडा दिवस अर्थात मद्य विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत जारी आदेशानुसार  जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


यानुषंगाने जिल्ह्यातील एफएल-२, एफएल-३,   एफएल-४, एफएल/बीआर-२ व सीएल-३ अनुज्ञप्तीधारकांना आपली दुकाने व मद्य विक्री केंद्रे संबंधित दिवशी बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.



'या' दिवशी राहणार कोरडा दिवस



६ सप्टेंबर २०२५ (शनिवार): अनंत चर्तुदशीच्या दिवशी कायद्यानुसार दारूबंदी लागू.


        


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक  उत्सव काळात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर देखील बारीक लक्ष ठेवावे, असे आदेशात नमूद केले आहे.


याव्यतिरिक्त, संबंधित कार्यक्षेत्रात काही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत संबंधित दुय्यम निरीक्षकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा देखील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी दिला आहे.



Previous Post Next Post