| नितीन फुलझाडे | ||||||
चिखली, दि. ०५ सप्टेंबर २०२५: जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने चिखलीत अब्दुल रफिक सेट मित्र मंडळातर्फे ह. खैरूल्लाहशाह बाबा शादी हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत 589 जणांनी रक्तदान केले.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला आमदार श्वेताताई महाले, सतीश सेट गुप्त,जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गायकवाड साहेब,स्थानिक गुन्हे शाखे चे PI अंबुलकर साहेब,ठाणेदार संग्राम पाटील साहेब यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने रक्तदात्यांचे मनोबल वाढले आणि शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यशस्वी आयोजन
आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्न आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी ठरले. वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांना मार्गदर्शन करत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. या उपक्रमाने सामाजिक एकतेचा संदेश दिला. आयोजकांनी भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
चिखली शहराने या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा आदर्श संदेश दिला.
मित्र मंडळा तर्फे सर्वांचे आभार
