*नितीन फुलझाडे*
*चिखली: जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड हेलगा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.अंबादास सिताराम नाटेकर यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सेवापूर्ती सन्मान सोहळा 28 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील पुष्पवर्षाव करून त्यांच्या लाडक्या सरांना निरोप दिला.तसेच यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. सदरील सन्मान सोहळा शाळा व्यवस्थापक समितीने आयोजित केला होता.*
*एकीकडे जिल्हा परिषद शाळा पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्तेच्या अभावाने बंद पडत असताना जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड हेलगा येथील सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण दिल्याने येथील शाळेची व विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने मान्यवरांनी याबाबत सर्व मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंदांचे आपल्या मार्गदर्शनात कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सन्मान सोहळ्याला उत्तर देताना सत्कारमूर्ती उच्चश्रेणी मुख्याध्यापक अंबादास नाटेकर यांनी सर्वांनी सेवा कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले तसेच ते थोडे भावनिकही झाले व यापुढेही शाळेसाठी आणखीही काही करता आले तर त्याला सर्वप्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.*
*सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ किरण पैठणे होत्या,प्रमुख अतिथी आर आर पाटील, गट समन्वयक प्रवीण वायाळ, शिक्षण विस्तार अधिकारी पी एम सपकाळ एच जी इंगळे, डोंगर शेवली केंद्रप्रमुख ए एन अनाळकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंद जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड हेलगा,सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य ग्रामपंचायत,सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद केंद्र डोंगर शेवली उपस्थित होते.*
