पुरस्कार गोपालदादा तुपकर यांना जाहीर
नितीन फुलझाडे
बुलडाणा चिखली : चिखली सीसीएन न्यूज व पुण्यनगरी दैनिकाचे पत्रकार, साप्ताहिक चिखली चे संपादक तसेच एस.व्ही.एम अभ्यासिकेचे अध्यक्ष सन्माननीय गोपालजी भगवानराव (भाऊ) तुपकर यांना संजीवनी संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. संजीवनी बहुउद्देश्य शिक्षण प्रसारक संस्था, केळवद आणि माँ रेणुका गौरक्षण संस्था, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराजा अग्रेसन रिसॉर्ट, मेहकर फाटा येथे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री भारत भाऊ बोंद्रे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री. विद्याधरजी महाले, तसेच आमदार सौ. श्वेता ताई महाले-पाटील उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्काराबाबत एस.व्ही.एम अभ्यासिकेत सन्माननीय गोपालभाऊ जाधव, कवी मनोहर पवार आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निवृत्तीभाऊ जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्यात तसेच पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.मनोहरभाऊ पवार यांनी याबाबतची माहिती दिली.
