बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धा

 




सहभागी होण्याचे आवाहन 


नितीन फुलझाडे 

बुलडाणा....

प्रत्येकांच्या ठायी असलेल्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, ते कौशल्य दाखविण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याचे काम आपल्या सामाजिक उपक्रमांतर्गत बुलढाणा अर्बन सातत्याने करत आले आहे. यंदाही बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने  महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बर्गर ,पिझ्झा त्यासोबतच चटपटीत खाद्यसंस्कृतीमुळे आरोग्यावर कळत नकळतपणे दुष्परिणाम होत आहेत. आपल्या आहारातील सकस अन्न काहीसे दुर्लभ होत असताना या स्पर्धेत तांदूळ या मुख्य घटकाभोवती वेगवेगळी पाककृती ४० मिनिटात स्पर्धकाना सादर करावी लागणार आहे.



आहाराद्वारे आरोग्य...ही संकल्पना वाढीस लागल्याच्या काळात घराघरांतील ‘शेफ’ मंडळी स्वयंपाक करताना खास विचार करू लागली आहेत. खाणे, खिलवणे आणि त्याबरोबर आरोग्याची काळजी घेणे यात रुची असलेल्या प्रत्येकासाठी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध पाककला स्पर्धा आयोजित करतात.

       महाराष्ट्रात सुद्धा कोकण, खांदेश, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र.भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर आणि बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ कोमलताई सुकेश झंवर, अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित खास महिलांसाठी पाककला स्पर्धा ठरत आलेली आहे.  सदर स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत, बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित केले आहे. या स्पर्धेसाठी विषय हा तांदळापासूनचे पदार्थ तयार करण्याचा आहे, या स्पर्धेसाठी आपल्याला आयोजकांकडून गॅस व शेगडी उपलब्ध करून दिल्या जाईल. तरी या स्पर्धेसाठी शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या पाककला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ प्रिती कोलारकर 9922397669,

कु.सुनिता जाधव 9011028173, 

सौ वर्षा खेर्डीकर 9604455227 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


अशी असणार स्पर्धा ....

1) तांदूळ हा मुख्य घटक आहे.

2) प्रत्येक स्पर्धकाला चाळीस मिनीट वेळ दिल्या जातील. 

3) चव, सजावट, घटक, मांडणी, स्वच्छता यानुसार गुण दिले जातील. 

4) आपला पदार्थ परिक्षकांसमोर करावा लागेल. 

5) आपल्याला पाककलेकरिता शेगडी आणी सिलेंडर संस्थेकडून देण्यात येईल. 

6) काही पूर्वतयारी घरुन करुन आणता येईल. 

7) परिक्षकांसमोर पाककृतीबद्दल माहिती देता आली पाहिजे.

8) आपल्या टेबलावर स्वच्छता असलीच पाहिजे.

9) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल

Previous Post Next Post