'
नितीन फुलझाडे
चिखली:-दयावान फाउंडेशन ग्रँड लॉन्चिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांचा वाढदिवस असा दुग्धशर्करा योग साधून एसव्हीएम अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेची ४० हजारांची पुस्तके भेट देण्यात आली. या पुस्तकांचा गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
दयावान फाउंडेशनच्या ग्रँड लॉन्चिंगप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास चव्हाण यांच्यासह दयावान फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. एसव्हीएम अभ्यासिकेचे संचालक शुभम तुपकर यांनी दयावान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास चव्हाण यांचे अभ्यासिकेच्या वतीने यथोचित स्वागत केले. दयावान फाउंडेशन येत्या काळात चिखली मतदारसंघातच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष सामाजिक कार्य राबविणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

आमदार श्वेताताई महाले यांनी स्थापन केलेल्या एसव्हीएम अभ्यासिकेमध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांना सशक्त करणे गरजेचे आहे. विद्याधर महाले हे खेड्यागावातून केवळ शिक्षणाच्या जोरावर मंत्रालयापर्यंत पोहोचले. ते सध्या महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, ही गौरवाची बाब असल्याचे दयावान फाउंडेशनचे सदस्य प्रवीण वायाळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणार
एसव्हीएम अभ्यासिका व संस्थापक अध्यक्ष विलास चव्हाण यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात दयावान फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन आम्ही करणार आहोत. गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेला पुस्तके देऊन त्याचा शुभारंभ केला आहे, असेही वायाळ याप्रसंगी म्हणाले.