नितीन फुलझाडे
बुलडाणा:- पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा डॉ. दीपक लद्दड सर व सौ. संगीता लद्दड मॅडम यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालयीन स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा, खजिना शोध, रांगोळी स्पर्धा, फळांची थाळ सजावट स्पर्धा तसेच मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. येथील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. यामध्ये विजेत्यांनी आपल्या कलागुणांची उत्कृष्ट झलक दाखवली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत भावना शिर्लोधे व वेदिका ठकरे यांनी विजेतेपद पटकावले. डिश डेकोरेशन स्पर्धेत पायल शेंडे, आलिया व्रूज व गीता सापकल यांनी विजय मिळवला.रांगोळी स्पर्धेत पदवी विभागातून पायल शेंडे, गीता सापकल, साक्षी देशमुख, आकांक्षा खरात, सुधर्शन गांडे व भाविक कचोळे यांनी विजेतेपद पटकावले. तर डिप्लोमा विभागातून राजर्षी हुंबड, पूर्वा झांडे, वेदिका बोचे, अदिती सांभरे, श्रुती चव्हाण, सिद्धी अंभोरे, विशाखा घोंगडे व आलिया व्रूज यांनी चमकदार कामगिरी केली.खजिना शोध स्पर्धेत गणेश अवरे, आकांक्षा खरात, सपना गवांदे, भोजराज सरोदे, यश गवई व शुभम मुंडले यांनी आपले कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावले.या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळा रविंद्र लद्दड सर व अर्चना लद्दड मॅडम यांच्या हस्ते पार पडला. महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी व कर्मचारी वर्गासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पडणे यामध्ये महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता.हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या पारपडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
