*एक हात मदतीचा..*
जाधव कुटुंबीयांसाठी धावुन आले....
श्री पावन हनुमान गणेश मंडळ व जय मातादी मित्रमंडळाने जोपासले सामाजिक दायित्व
नितीन फुलझाडे
चिखली:- स्थानिक आनंद नगर येथील रहिवाशी संजय धोंडीराम जाधव यांचा 29 ऑगस्ट रोजी 8 वाजता अपघात झाला होता.त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे हॉस्पिटला भरती करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,आणि त्यांची घरची परिस्थिती खूप हलाकीची आहे. त्यांना उपचारासाठी लागणारा खर्च बघता श्री पावन हनुमान गणेश मंडळ व जय माता मित्र मंडळ यांचे कडुन 41000 रुपयाची रोख रक्कम देण्यात आली आहे ....
श्री पावन हनुमान गणेश मंडळ व जय माता दि मित्र परिवार आनंद नगर मित्र मंडळ हे नेहमी असे सामाजिक माणुसकी जोपासण्याचे काम करत असते. गणेश मंडळ व मित्र मंडळाच्या या कार्याबद्दल जनमानसत एक सकारात्मक संदेश जात आहे. या मंडळातील सर्व सदस्य नेहमीच आपापल्या परीने फुल किंवा फुलाची फुलाची पाकळी आर्थिक मदत करून कोणत्याही चांगल्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलत असतात हे विशेष.
