अंबिका अर्बनकडून पत्रतपस्वी अनिल पळसकरांचा सत्कार

 


नितीन फुलझाडे 

चिखली : नुकताच राज्यस्तरीय बहुजनरत्न जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले   दैनिक विदर्भ दर्पणचे सल्लागार संपादक अनिलनाना पळसकर यांचा अंबिका अर्बनच्या वार्षिक आमसभेमध्ये  पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रविवार दि. १० ऑगस्ट रोजी येथील अंबिका अर्बन मल्टीस्टेटची आमसभा संपन्न झाली. याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सायं दैनिक विदर्भ दर्पणचे सल्लागार संपादक अनिलनाना  पळसकर यांना नुकताच राज्यस्तरीय बहुजनरत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याअनुषंगाने बँकेचे सभासद असलेले अनिलनाना आमसभेला हजर असतांना बँकेचे वतीने संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.संध्याताई कोठारी व लोकप्रिय आमदार सौ.श्‍वेताताई महाले पाटील यांचेहस्ते शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज आणि जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अनिलनाना पळसकर यांनी सन्मान केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी अध्यक्ष ऍड. विजय कोठारी, उपाध्यक्ष नागवानी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला, पंडितराव देशमुख, श्रीराम कुटे, सुरेंद्रप्रसाद पांडे, वाशिम जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे, प्रा.विष्णूपंत पाटील (बुलडाणा), संस्थेचे सर्व संचालक  तसेच मान्यवरांसह संस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते.
Previous Post Next Post