नितीन फुलझाडे
चिखली: आदर्श विद्यालय हे एक उपक्रमशील विद्यालय आहे .त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच रक्षाबंधन. आदर्श विद्यालयात दिनांक 11-8-2025 वार मंगळवार ला अतिशय उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.प्रत्येक विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली रक्षाबंधन यावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
वृक्ष हेच खरे मित्र या दृष्टीने वृक्षांना राखी बांधण्यात आली .या कार्यक्रमाचे प्रसंगी आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गव्हले सर,उपमुख्याध्यापक श्री आरसोडे सर,पर्यवेक्षक श्री तायडे सर,पर्यवेक्षक श्री दंडे सर,पर्यवेक्षक श्री एल पी शेटे सर,श्री सुधीर शेटे सर व सौ खोत मॅडम उपस्थित होते अतिशय उत्साहाच्या वातावरणात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. झाडांना राखी बांधून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
