नितीन फुलझाडे
शेगाव:- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन दिनांक ८ व ९ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, श्री पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगाव, जि. बुलढाणा येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री. कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिर या वर्षी जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अवघ्या १५ दिवसांमध्ये १३६२७० रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड आदी उपक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमासाठी पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. ८ व ९ ऑगस्ट २०२५ रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक ८ ऑगस्ट ला उपासक दीक्षा व दि. ८ ऑगस्ट रोजी साधक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व उपासक यांनी साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन पीठ इंजिनिअर श्री दिपक चिंचोले, पीठ महिला प्र. व जिल्हा निरीक्षक सौ लताताई चिंचोले, पीठ सदस्य श्री संतोष दसरे, जिल्हा अध्यक्ष श्री गणेश खडोळ, व महिला अध्यक्षा सौं निंभोरे ताई तसेच पश्चिम विदर्भ पीठ समिती, जिल्हा तालुका व संतसंग सेवा समिती यांनी केले आहे.
