शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना) आक्रमक झाल्याने कार्यवाही
नितीन फुलझाडे
चिखली:- दिनांक 4 ऑगस्ट रोजी नर्मदेश्वर महादेव मंदीर राजा टॉवर येथे श्रावण सोमवारी गजानन पालवे नावाचे व्यक्ती बेलपान विकण्यासाठी बाजुला बसले होते. नगरपालीकेतील ठेकेदाराचे भाडोत्री यांनी बेलपान विकनार्या व्यक्तीला व पवीत्र बेलपानाला लात मारल्याचे लक्षात आले. ही बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सेनेच्या कानावर आल्यानंतर लगेच सर्व पदाधीकारी यांनी नगरपालीकेस घेराव घातला व तसेच ठाणेदार संग्राम पाटील यानी एक दिवस वेळ चर्चेअंती मागीतला आज शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांनी ठाणेदार यांची भेट घेतली असता आरोपीला अटक करुण संबंधीत हिंदु धर्माच्या भावना दुखवनार्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ताला अटक करुण बेड्या ठोकल्याचे ठाणेदार यांनी सर्व शिवसैनीकांना आश्वस्त केले.
या
श्रावण महीना अत्यंत पवित्र मानला जातों या पवित्र महिन्यात सर्वजण महादेवाची मनोभावे पूजा करतात मात्र याच भक्तिला ठेच पोहचवणारी एक दुदैवी घटना चिखली शहरात घडल्या मुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कर्हाडे,युवासेना शहर प्रमुख आंनद उर्फ बंटी गैची, माजी नगरसेवक शामभाऊ शिगणे, युवासेना विधानसभा संघटक हरीभाऊ इंगळे, उपशहरप्रमुख समाधान जाधव,रवी पेटकर, शंभु गाडेकर, अनिल जावरे, गणेश कुडके,राहुल वरवंडे, बंडू नेमाने बंडू गारडे, संतोष देशमुख पिंटू गायकवाड, सतनामसिंग वधवा, सचिन जोशी, अनिल गवळी, दिनेश शर्मा, गुरूराज बिडवे, वैभव घाडगे, आत्माराम गायकवाड़, दीपक सोलाट, साजिद भाई, दिनेश गैची, अतुल मगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व हिन्दू समाज उपस्थित होते.
शेतकरी कष्टकऱ्याच्या व्यथा
*चिखली शहरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी, सामान्य नागरिक, कष्टकरी नागरिक चिखली येथे बाजारात आपले दुकान चालवतात. चिखली न.प त्यांच्याकडून रोज कर वसुली करते. सोमवार रोजी वसुली करत असतानी न.प यांच्या ठेकेदारानी व त्यांच्या विकृत माणसांनी एक सामान्य नागरिक येथे बेलपान विकत* *होता, त्याला मारहाण केली व त्याचा पूर्ण बेलपान देखील पायानी फेकून दिले.* *हे कळताच शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी चिखली न.प वरती आंदोलन केले*
*चिखली मध्ये वाढलेली दादागिरी आता सामान्य नागरिक व कष्टकरी शेतकरी* *यांच्या पर्यंत पोहचलेली आहे. चिखली न.प चे अधिकारी यांना सांगून ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्या वरती लवकरात* *लवकर कारवाई झाली पाहिजे. कारवाही नाही झाली तर शिवसेना स्टाईलने आम्ही आमच्या हाताने कारवाई करू.*
-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सैनिक........
ह्या वेळी शिवसेना,युवासेना पदआधिकारी उपस्थित होते.*
*UPDATE*
आरोपीला अटक करण्यात आली आहे.

