"देवाभाऊ लाडकी बहीण"पतसंस्थेचे ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.....





 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांचे आवाहन...
 
नितीन फुलझाडे 
चिखली: बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी "देवा भाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था" चिखली,जिल्हा बुलढाणा स्थापन होत असून शासकीय परिपत्रकाद्वारे राज्यभरात स्थापन होत असलेल्या 'लाडकी बहीण पतसंस्था' या उपक्रमातील संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये व चिखली शहरामध्ये स्थापन होत असल्याने संबंध जिल्हावासि्यांसाठी व चिखली वासि्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या पतसंस्थेचा भाग होऊन आपली सामाजिक व आर्थिक उन्नती साध्य करून घेण्याची संधी शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील लोकसंख्येचा 50% भाग असलेल्या आणि 2024 पासून लाडकी बहीण या सन्मानजनक नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला वर्गाला दिली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आणि आर्थिक सक्षमता व स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फक्त लाडक्या बहिणींसाठी असलेली लाडकी बहीण पतसंस्था राज्यभरात स्थापन करण्याचा निर्णय घेऊन स्त्री सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तरी महाराष्ट्रात सर्वप्रथम चिखली मध्ये स्थापन होत असलेल्या लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटनाला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.

चिखलीमध्ये देवा भाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था चिखली, जिल्हा बुलढाणा असे नाव असणाऱ्या या पतसंस्थेमध्ये लाडकी बहीण योजनेचा ज्या स्त्रियांना लाभ मिळतो त्या भगिनीच फक्त सभासद होऊ शकणार आहेत. त्या अर्थाने आर्थिक दुर्बल घटकातून येणाऱ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणाची ही नांदी म्हणता येईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांचा सहभाग असलेल्या हजारो पतसंस्था महाराष्ट्रात कार्यरत असून त्याही महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आणि त्यातही फक्त स्त्रियांना एका नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून एका बँकेच्या आणि एका आर्थिक व्यवस्थेच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याची संधी देऊन महाराष्ट्र शासनाने स्त्री पुरुष समानता आणि आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी उचललेले हे नितांत सुंदर पाऊल मानले जाऊ शकते.




 या पतसंस्थेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या त्याचप्रमाणे गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांशी जुळलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा मोठा प्रकल्प असणार असून, महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी बचत तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात येणारी सहकारी पतसंस्था आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी घ्यावा असे आवाहन आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी व नियोजित देवा भाऊ लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था चिखली जिल्हा बुलढाणा या पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळाने केले आहे.

 रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर स्थापन होत असलेल्या देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था चिखली,बुलढाणा या पतसंस्थेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव असणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री भारत बोंद्रे, आमदार चैनसुख संचेती,आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड,आमदार मनोज कायंदे, माजी आमदार तोतारामजी कायंदे,माजी आ. शशिकांत खेडेकर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे राहणार असून या सर्व आयोजनाची व स्वागताची सर्व तयारी देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळ चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.

 तरी या नियोजित देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटनाला 9 ऑगस्ट 2025 रोजी,शनिवारी सकाळी 10:00 वाजता अंबिका कॉम्प्लेक्स, मेन रोड, चिखली येथे संपूर्ण जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी अतिशय उत्साहाने व मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.

Previous Post Next Post