आदर्श विद्यालय चिखली येथे हर घर तिरंगा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


नितीन फुलझाडे 

चिखली: स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाचे उपप्राचार्य भगवानराव आरसोडे तसेच पर्यवेक्षक श्रीपादजी दंडे,प्रकाशजी तायडे आणि लक्ष्मीकांत शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असताना विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्रीपाद दंडे, सुधीर शेटे आणि गणेश अंभोरे सर यांनी केले त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजामध्ये तुळस या रोपाचे महत्त्व तसेच पर्यावरण पूरक असा उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला यामध्ये विद्यालयातील सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली तुळशीची रोपे येऊन रॅली काढण्यात आली सदर कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयातील हरित सेना प्रमुख संजय ठाकरे व योगेश कुलवंत यांनी केले. तसेच हर घर तिरंगा याचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये स्वातंत्र्य दिनावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी अशा विविध स्पर्धांच्या आयोजन विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच विद्यालयामध्ये दिनांक 13 ऑगस्ट रोजी विद्यालयाचे प्राचार्य सतीश गवले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर ध्वजारोहणासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक,कर्मचारी तसेच विद्यार्थी बंधू-भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगण्यात आले. 
Previous Post Next Post