15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेचे आंदोलन - विजयकांत गवई




चिखली:- आधार केंद्र व इ महा सेवा केंद्र यांच्यावर चौकशी करून कार्यवाही न केल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर अगळे वेगळे आंदोलन छेडण्यात येणार आहे. असे निवेदन चिखली तहसीलदार यांना दि. 12 ऑगस्ट रोजी देण्यात आले. 23 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की आधार केंद्र व इ महा सेवा केंद्र नियोजित ठिकाणी नसुन ते इतर ठिकाणी चालवत आहे. तसेच दुसरे निवेदन दि. 6 ऑगस्ट रोजी दिले त्यात नमूद केले आहे की चिखली तालुक्यातील आधार केंद्र व इ महासेवा केंद्र संचालक नागरिकांकडुन व विद्यार्थ्याकडून जास्तीचे पैसे घेऊन कोणत्याच प्रकारची पावती न देता नागरिकांची व विद्यार्थ्यांची लुबाडणूक करत आहे त्यांना आळा घालावा आणि तिसरे निवेदन दि. 12 ऑगस्ट लाच दिले की चिखली तहसील कार्यालयातील आधार सेतू पाच वर्षापासून गायब आहे. त्या सेतूची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी तीन निवेदनाद्वारे केली होती या सर्व प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी परंतु आज पर्यंत तहसील कार्यालयामार्फत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आधार केंद्र संचालक हे नागरिकांकडून नवीन आधार कार्ड काढणे हे मोफत आहे. तरी नागरिकांकडून शंभर रुपये घेतात नाव बदलणे मोबाईल नंबर बदलणे पन्नास रुपये असून जास्त पैसे घेतात आणि इ महा सेवा सेवा केंद्र संचालक हे नागरिकांकडून  दाखल्याचे शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे 69 रुपये असते तरी या दाखल्याचे आणि इतर दाखल्याचे नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये तीनशे रुपयाची लुट होताना दिसत आहे. तरी चिखली तहसीलदार यांचे आधार केंद्र व इ महा सेवा केंद्र यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष आहे आणि चिखली तहसीलदार साहेब यांनी प्रत्येक आधार केंद्र व इ महा सेवा केंद्र यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबवण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. 15 ऑगस्ट रोजी चिखली तहसील कार्यालयासमोर अगळे वेगळे आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिले. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे, जिल्हा महासचिव सलीम शेख, कामगार जिल्हाध्यक्ष सुरेश इंगळे हे उपस्थित होते.
Previous Post Next Post