गोदरी येथे महामयी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न

 


आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर समस्त खरे परिवाराच्या वतीने भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला

नितीन फुलझाडे 
गोदरी (ता. चिखली) –
देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनी गोदरी येथील जुने पारंपरिक महामयी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मंदिराचा जिर्णोद्धार समस्त खरे परिवाराच्या लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात येत असून, याचे भूमिपूजन भाजप युवा नेते विजयसिंह खरे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. भारती खरे यांच्या शुभहस्ते पार पडले.

हे मंदिर खरे कुटुंबाचे पूर्वज स्व. फकीरा शमा खरे यांनी स्थापन केले होते. आज त्यांच्या पुढील पिढीकडून त्या मंदिराच्या पुनर्बांधणीस प्रारंभ झाल्याने उपस्थित भाविकांनी भावनिक वातावरणात हा ऐतिहासिक क्षण अनुभवला.

या प्रसंगी गावचे सर्वपक्षीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात  अशोक सुरडकर, संतोष कोथलकर, भरत जोगदंडे, विनोद भवर, रामलाल खरे, भिका खरे, संजय खरे, गणेश खरे, काशीराम खरे, संतोष खरे, विलास खरे, किसन खरे, मनोज खरे, गीताताई खरे, छोटाबाई खरे, निर्मलाताई खरे, मीनाताई खरे, मंदाताई खरे, कुसुमाताई खरे, अनिताताई खरे, बबिताताई खरे आणि अनेक ग्रामस्थ व समाजबांधवांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन भाविक खरे परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, "या जिर्णोद्धार कार्यात सर्व ग्रामस्थांचे व समाजबांधवांचे सहकार्य लाभत आहे, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या मनःपूर्वक आभारी आहोत."

मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर ते गावासाठी आध्यात्मिक केंद्र, सांस्कृतिक वारसा व सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post