*चिखली पोलिसांनी अवघ्या तीन तासात आवळल्या आरोपीचे मुस्क्या*
नितीन फुलझाडे
चिखली : राऊतवाडी स्टॉप येथील एका मायक्रो फायनान्स मधून ४९००० हजार रुपयाचे कर्ज पत्नीच्या नावे काढून त्यातील तीन हजार रुपये स्वतः जवळ खर्चासाठी वरील खिशात ठेऊन उर्वरित रक्कम फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीजवळ पर्समध्ये ठेवण्यासाठी दिली.हे कुटुंब ग्रामीण भागातील असून ते पती-पत्नी घरी जाण्यासाठी राऊतवाडी स्टॉप वरून पायी बस स्टँड कडे जात असताना शिवाजी शाळेच्या गेट जवळ दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास एका ऑटो वाल्याने त्यांच्या समोर ऑटो अडवा लावला व ऑटो मध्ये मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी याचा गळा पकडून जीवी मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वरच्या खिशातील तीन हजार रुपये व त्यांच्याजवळ असलेले दोन मोबाईल घेऊन ते दोन्ही आरोपी खामगाव चौफुलीच्या दिशेने ऑटो घेऊन पळून गेले.अशी फिर्याद संबंधित व्यक्तीने चिखली पोलीस स्टेशनला दिल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या तीन तासात तपासाची चक्रे फिरवत मोठ्या शिताफीने चिखली पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुस्क्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला आहे.*
सविस्तर असे की सदर गुन्ह्याची फिर्याद पोलिस स्टेशनमध्ये दाखल होताच सदर गुन्हयाचे संबंधाने ठाणेदार पो.नि.संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथक यांना गुन्हयासंदर्भाने सखोल तपास करणे व आरोपी याचा तात्काळ शोध घेणेकामी सुचना दिल्या. त्यानुसार डि.बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे गांभीर्य पाहता गुन्हयातील मुददेमाल व आरोपी शोधकामी तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली. तसेच माहितीगार यांचे कडुन माहिती घेवुन सदरचे आरोपी हे बुलडाण्याचे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळवली.
सदरची माहिती ठाणेदार यांना देवुन डि.बी पथक तात्काळ बुलडाणा रवाना होवुन गुन्हयात वापरण्यात आलेली ऑटो तसेच आरोपी यांचा शोध घेवुन आरोपी शेख नुमान शेख शकील रा बुलडाणा , फैजान खान नईम खान रा बुलडाणा हे पळुन जाण्याच्या बेतात असताना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन सदर गुन्हयाबबात विचारपुस केली असता दोघानी 4 जुलै रोजी सदरचा गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत कबुली दिली. त्यांचेकडुन चोरीस गेलेले २ मोबाईल किमती १८५०० रु व नगदी १७६० रुपये रोख रक्कम तसेच चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरलेला ऑटो कीमती ८००००/- असा एकुण १००२६० (एक लाख दोनशे साठ रु.) मुद्देमाल हस्तगत करुन सदर गुन्हयात आरोपी यांना अटक करुन वि.न्यायालयासमोर हजर केले असता त्याना वि.न्यायालयाने जेल रवाना केले आहे.
सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक निलेश तांबे बुलडाणा,अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी बुलडाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संग्राम पाटील, डि.बी.पथकाचे पोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे बनं ९०२, पोना अमोल गवई ब नं २२६१, पोका प्रशांत धंदर ब न ५८१, पोकॉ अजय इटावा बनं ४५४, पंढरीनाथ मिसाळ ब न १२१६,, निलेश सावळे ब न १३४७, राहुल पायघन ब न २५७०, मपोकॉ रुपाली उगले ब न २४१८ पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.चिखली पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीचे मुस्क्या आवळल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

