माणसे जोडणारी नियती आणि गावे जोडणारी यांत्रिकी हिच भाजपाची संस्कृती... आ. सौ. श्वेताताई महाले...
नितीन फुलझाडे
चिखली: महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आज दिनांक ६ जुलै रविवार रोजी पुणे नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे पेठ तालुका चिखली येथे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या विशेष मार्गदर्शनाने व सहकार्याने बांधण्यात आलेल्या 35 कोटी रुपयांच्या पुलाचे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार सौ श्वेता महाले माणसे जोडणारी नियती, व गावे जोडणारे रस्ते पूल बनवणारी यांत्रिकी या सरकारची व भाजपाची संस्कृती असल्याचे प्रतिपादन केले. यापूर्वी देशातील पायाभूत सुविधांसाठी भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अभाव असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचे बरेच नुकसान झाले आहे",लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापर्यंतच मर्यादित नव्हत्या तर त्यात शेती, व्यवसाय आणि उद्योगांचाही समावेश होता, याकडे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी लक्ष वेधले.
मूलभूत सुविधांसोबतच आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मितीही तितकीच महत्त्वाची असल्याचे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सांगितले. जे मतांचे राजकारण करतात ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन योजना आखू शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या. यापूर्वी दोन ते तीन वेळा केंद्र सरकारकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला होता परंतु स्थानिक राजकारण्यांना देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेची नाडी असलेले पूल व रस्ते यांचे महत्त्व न कळल्यामुळे हा पैसा न वापरता परत गेला. गरजा वाढत असताना त्या पूर्ण करण्यासाठी फार लवकर कमी पडणाऱ्या वा सोयीसुविधा निर्माण न करण्याच्या काँग्रेसी संकुचित विचारावर त्यांनी टीका केली. अशा विचारामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले, असे आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
ADD........
.....................................
............................................
चिखली मतदारसंघात जेथे वाहतुकीची अडचण आहे तेथे पूल व रस्ते बांधून ही समस्या आधी दूर केल्यामुळे इतर अनेक कामे मार्गी लागतात. या पुलाचे बांधकाम करताना जमिनी संपादित करताना सात शेतकऱ्यांच्या गट बदल झाल्यामुळे मोबदल्याच्या काही शिल्लक अडचणी येथे होत्या. या अडचणींचा बाऊ न करता आमदार म्हणून माननीय नितीनजी गडकरी यांच्या कानावर या अडचणी टाकल्या, महाराष्ट्राची सुपुत्र असलेले व देशाचे सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नावलौकिक असलेले नामदार गडकरी साहेबांनी स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत बऱ्याच वेळा मीटिंग घेऊन हा पूल कसा तयार होईल त्या संदर्भातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न केले. त्याची परिणीती म्हणून आज या फुलाचे लोकार्पण माझ्या हस्ते होत आहे यासाठी मी नामदार गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते असे आमदार असे सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.
मागील 25 वर्षापासून या ठिकाणी योग्य पुलाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा जीवितहानीसारखे अपघात झाले. परंतु असंवेदनशील काँग्रेस सरकार आणि त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना याबाबतीत कधी सोयर सुतक राहिलेले नव्हते. आम्ही लोकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मागील लोकप्रतिनिधीने आपल्या सोयी सुविधेसाठी लोकांचा वापर केला. एवढ्या महत्त्वाच्या पुलासाठी काही महसुली सुधारणा करून हा फुल बनवणे व त्यायोगे त्या अभावी झालेल्या जीवितहानी रोखणे हा लोकप्रतिनिधीचा प्रयत्न असायला हवा परंतु या अगोदर आलेले पैसे का परत गेले? हा मोठा विषय आहे असे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.
अतिशय उपयुक्त सुमारे 35 कोटी किंमत असलेला हा पूल बनवताना स्थानिक कंत्राटदार,शासकीय अधिकारी व संबंधित पदाधिकारी सगळ्यांनीच अतिशय तत्परतेने व मानवीय दृष्टिकोनातून पूल बनवण्यासोबतच काही सकारात्मक सामाजिक दायित्वाची अधिक कामे जी कंत्राटामध्ये उल्लेखित नव्हती ती सुद्धा केली.
चिखली खामगाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सी वरील पेठ गावा जवळील पैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे कामा सोबत करण्यात आलेली सामाजिक कामे
अस्तित्वातील दुर्लक्षित दगडी बंधारा नूतनीकरणः नवीन काँक्रीट भिंतीचे काम करून पाणी अडविले. वरील बाजू साफ करून खोलीकरण करण्यात आले. या बंधाऱ्यात आधी जलसाठा होत नव्हता तो आता ९ सहस्त्र घन मीटर (TCM) एवढा झाला आहे. प्रचलित दरा प्रमाणे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीस जवळ जवळ २० लक्ष एवढा खर्च आला असता. या बंधाऱ्यामुळे त्याच्या खालच्या बाजूच्या १५ एकर जमिनीतील विहिरी रिचार्ज झाल्या. आता या १५ एकर जमिनीत रबी चे पीक घेणे शक्य झाले आहे.
रिव्हर ट्रेनिंग मधून निघालेला नदीच्या काठावरील गाळ/माती शेतकऱ्यांनी त्यांच्या मुरमाळ व पोटखराब जमिनीत टाकली. अशा तन्हेने एकूण २० एकर जमीन पिकाऊ झाली व आता शेतकऱ्यांनी या जमिनीत सोयाबीन पेरले आहे. पुलाच्या कंत्राटदाराने नदीच्या काठावर साचलेला गाळ मशीनने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मध्ये भरून दिला व शेतकऱ्यांनी तो त्यांच्या न पिकणाऱ्या जमिनीत टाकला. काही क्षेत्रात कंत्राटदाराने त्याच्या स्वतःच्या मशिनरीने या गाळाची वाहतूक करून दिली व तो गाळ पसरवूनही दिला. थोडक्यात नदीचे रुंदीकरण होऊन पुराचे पाणी आजूबाजूचे शेतात पसरण्याची शक्यता कमी झाली. व २० एकर जमीन पिकाऊ झाली आणि ती ही विनाखर्चाने।
उतरदा पाझर तलावातून मुरूम काढून या पुलाच्या पोच मार्गाच्या भरावास वापरण्यात आला. यामुळे या पाझर तलावाची साठवण क्षमता ३० सहस्त्र घन मिटर ने वाढली. व जलसंधारणाचे काम विनामूल्य होऊन शासनाची ५४ लक्ष रुपयांची बचत झाली. तसेच याचा फायदा उतरदा या गावाच्या पाणीपुरवठा योजनेस सुद्धा होणार आहे.
या पुलाच्या पोचमार्गावर वृक्षारोपण काही लांबीत झाले. उर्वरित लांबीत ते करण्यात येत आहे.
या कामाच्या कारारनाम्याप्रमाणे वरील कामे करणे अपेक्षित नव्हते परंतु सामाजिक बांधीलकी ठेऊन कंत्राटदाराने ही कामे विनामूल्य केली.
या लोकार्पण प्रसंगी डॉक्टर प्रताप सिंह राजपूत प्रदेश कार्यकारणी सदस्य,श्री अंकुशरावजी पडघान, डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष, शिवाजीराव देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना, मायाताई म्हस्के शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख, सरपंच श्री विष्णू शेळके, एकनाथ जाधव,बबनराव राऊत, बळीराम काळे,सौ सिंधु तायडे, श्री अंकुश तायडे, माजी सरपंच सुलाबाई शेळके व महायुतीचे कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

