वाहनधारकांना वाहने चालवण्यासाठी करावी लागत आहे तारेवरची कसरत..
नितीन फुलझाडे
चिखली: शहरातील वरदळीचा व मुख्य मार्ग म्हणून असलेला राऊतवाडी स्टॉप ते खामगाव चौफुली या मार्गावर अक्षरशः मोठमोठे खड्डेच खड्डे झाले असून नागरिकांना येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातही दररोज घडत आहेत. हा रस्ता बुलढाणा अर्बन या पतसंस्थेकडे BOT तत्वावर असून याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील त्यांचीच आहे त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत काही नागरिक सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करीत असून संबंधित विभागाने(यंत्रणेने) हे खड्डे तात्काळ बुजवावी अशी विनंती करीत आहे.
रस्त्याच्या मधोमध व रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे झाली असून पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने त्यामध्ये पाणी भरल्यावर वाहनधारकांना त्या गड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे तर नुकसान होतच आहे पण एखांदी अप्रिय घटना(मोठा अपघात) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोशल मीडिया वायरल....


