धोत्रा भनगोजी येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पहिला दिवस

 



प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देणार का 


नितीन फुलझाडे 

 चिखली(धोत्रा भानगोजी):


धोत्रा भनगोजी येथील जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या असून 14 शेतकऱ्यांच्या पेरण्या केवळ शेतरस्ता नसल्यामुळे खोळंबल्या आहेत. शेत पडीत पडण्याची शक्यता असल्याने अखेर त्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला असून आज ता. 03 जून रोजी बुलडाणा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 

      याबाबत सविस्तर असे की, विद्यमान तहसीलदार चिखली यांनी ता. 20/10/ 24 रोजी च्या आदेशाचे अनुपालन करण्यासाठी येथील शेतरस्ता मोकळा करण्यासाठी गेले असता आंधई, धोत्रा भनगोजी या जोड रस्त्यापासून उत्तरेस गट क्रमांक 201 व  गट क्रमांक 202 मधून दोन्ही घराच्या मधून वहिवाटी असलेला रस्ता पुढे गट नंबर 203 या हद्दीबाहेर कच सोडून पश्चिमेकडील बाजूने  अच्युतराव काशीबा हळदे यांचे गट क्रमांक 201 यांच्या गट क्रमांक 199 पर्यंतचा बैलगाडी,ट्रॅक्टरचा रस्ता वडिलोपार्जित आहे. परिणामी तहसीलदार संतोष काकडे हे संबंधित ठिकाणी येऊन शेतरस्ता मोकळा करण्यासाठी आले असता गट क्रमांक 203 मधील नेताजी काळे यांनी माझे कच बाजू सिद्ध करावी व नंतर रस्ता द्यावा अशी मागणी केल्यानंतर तहसीलदार काकडे परत गेले. भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज देऊन सदर शेतरस्ता व्यवस्थित करणार असल्याचे समजते. 





परिणामी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही पेरण्या न झाल्याने त्यांनी आमरण उपोषण करण्याचा रस्ता अवलंबला आहे. यामध्ये शेतकरी महिलांचाही समावेश आहे. यात विलास अजितराव हळदे, संजय देसाई गुजर, शिवदास विश्वनाथ कापसे, गजानन बाबाराव जाधव, सौ दुर्गा विलास हळदे, सौ. मिना राजेंद्र गुजर, सौ. वर्षा समाधान गुजर, सुरेखा सुरेश भालेकर हे उपोषण करणार असून यांच्यासह 14 शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही झालेल्या नाही. शासन प्रशासन याकडे स्पष्टपणे डोळे झाक करीत असल्याने शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे. यामुळे जवळपास 70 एकर शेत जमीन पडीत पडण्याच्या मार्गावर  आहे. याबाबत जोपर्यंत शेतरस्ता मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन  जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले असून त्याच्या प्रतिलिपी पोलीस अधीक्षक बुलढाणा, विभागीय अधिकारी बुलढाणा, तहसीलदार चिखली, पोलीस स्टेशन अमडापूर यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी हा अखेरचा मार्ग असल्याचे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे. या शेत रस्त्याचा त्वरित निर्णय लावून शेत जमीन पेरणी व्हावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Previous Post Next Post