उदयनगर येथे महावितरण उपविभाग व पेठ शाखेचे थाटात लोकार्पण....
नितीन फुलझाडे
चिखली(उदयनगर)-
30000 नोंदणीकृत ग्राहकामागे एक उपविभाग असला पाहिजे हा महावितरणचा नियम आहे, 30000 नोंदणीकृत ग्राहकांचा टप्पा महावितरण ने 2011 मध्येच ओलांडला होता त्या अनुषंगाने कार्यक्षम लोकप्रतिनिधीने 2012 मध्ये उदयनगर व पेठ येथील या उपविभागाचे लोकार्पण करायला हवे होते, परंतु लोकप्रतिनिधीची उदासीनता समाजाला विकासाच्या उलट्या दिशेने घेऊन जाते त्यामुळे 2012 मध्ये ज्या उपविभागाचे उद्घाटन व्हायला हवे होते त्याचे उद्घाटन 2025 मध्ये होत आहे अशी खंत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले यांनी व्यक्त केली.
आज महावितरणच्या उदयनगर व पेठ येथील उपविभागाचे लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी उद्घाटनिय भाषणामध्ये आमदार सौ. श्वेता महाले पाटील बोलत होत्या. उदयनगर उपविभाग अंतर्गत पेठ येथे आपल्याला एक शाखा मिळालेली आहे आता या दोन्ही ठिकाणी जवळजवळ 36 लोकांना रोजगार उपलब्ध होईल त्याचप्रमाणे जवळपासच्या 28 गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागेल ही अतिशय आनंदाची बाब असून महावितरण ने देखील भौगोलिक क्षेत्रफळाचा आणि परिस्थितीचा विचार करून नजीकच्या सेंटरला जवळपासचीच गावे जोडली पाहिजे अशी सूचना देखील आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिली.
कधी कधी लोक अपप्रचाराला बळी पडून विकासाला विरोध करतात आणि त्यामुळे आपल्या सर्वांचेच समाज म्हणून नुकसान होत असते. अशा भोळ्या प्रवृत्तीमुळेच पेठ येथे होऊ शकणारे महावितरणचे उपकेंद्र पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यामुळे आपल्याला धोत्रा भनगोजी येथे हलवावे लागले अशी कान उघडनि देखील आ. महाले यांनी केली.
महायुती व महाविकास आघाडी या दोन सरकारमधील तुलनात्मक फरक समजावून सांगताना आमदार श्वेता महाले म्हणाल्या की महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांकडे वीजबिल बाकी असेल तर, त्या शेतकऱ्याची वीज कापण्यासाठी महावितरण ला आदेशित करण्यात आलेले होते. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्याच्या विज जोडणीला कुणी हात लावला नाही तसेच समाजातील विविध घटकांसाठी फडणवीस सरकार समाधान कारक पणे काम करत आहे.
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण विभागाला करून देताना ज्याप्रमाणे या योजनांचा योग्य प्रचार प्रसार केला जातो त्या प्रमाणात त्या योजनांची अंमलबजावणी करताना योग्य त्या कालावधीची शिस्त बाळगली जात नाही. योग्य प्रसिद्धीमुळे भरपूर अर्ज योजनांसाठी महावितरण कडे येतात परंतु सेवा देताना विविध कारणामुळे असेल कदाचित परंतु त्या दर्जाची सेवा महावितरण कडून दिली जात नाही तरी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी देखील जनतेची सेवा हे आपले कर्तव्यच आहे असे समजून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे अशी सूचना आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी केली.
चिखली तालुक्याचा वाढलेला विस्तार, त्या अनुषंगाने वाढलेले वीज ग्राहक, कृषी पंपाच्या वाढत जाणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या चिखली महावितरण उपविभागाचे विभाजन करून नवीन महावितरण उपविभागाची निर्मिती करणे व त्यामुळे महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पदसंख्या वाढून शेतकरी, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना योग्य व वेळेत सेवा मिळावी या उद्देशाने आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून चिखली तालुक्यातील उदयनगर येथे महावितरणच्या नवीन उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळवून घेतली आहे.
मतदारसंघातील अन्वी येथील ई क्लास जमिनीवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले होते. ग्रामपंचायत व गावक-यांच्या मागणीनुसार प्रशासनामार्फत सदर जमिनीवरील अतिक्रमण हटवून ती जमीन सोलरपार्क उभारण्यासाठी महावितरणला उपलब्ध करून देण्यात आली. व तालुक्यातील पहिल्या सोलरपार्क उभारणीची पूर्वतयारी करून काम प्रगतीत आहे. अन्वी येथील सोलर पार्क मध्ये निर्माण झालेली वीज धोत्रा भनगोजी येथील उपकेंद्रास पुरवठा करून त्याद्वारे परिसरातील गावांमध्ये असणाऱ्या लोड शेडिंगवर मात करता येणार आहे. व नागरिक तसेच शेतकरी यांना अखंडित वीज पुरवठा करता येईल.अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली.
या संबंधित गावांमध्ये शेतीसाठी सुद्धा दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांचे शेतीला सिंचन करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाण्याचे कष्ट वाचणार आहेत.परिसरामध्ये विद्युत पंपाला फुल होल्टेज मिळेल. त्यामुळे विद्युत पंपाची वायरिंग जळणार नाही. विद्युत पंप पूर्ण क्षमतेने पाणी सप्लाय करतील. अकस्मात लोडशेडिंग ची समस्या समाप्त होईल. पर्यायाने शेती उत्पादनात वाढ होईल.अशी माहिती आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी दिली.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता मंगलसिंह चव्हाण, कलंत्री, अमोल साठे,संजय महाले, सावीत्री राऊत,शिवनारायण नखोद, दिगंबर राऊत,राजेंद्र हरपाळे, पंढरी पाटील कुलसुंदर,बंडू बिडवे, महादेव ठाकरे,गजानन दूधाळे, पुरुषोत्तम गुंजकर,संतोष पाटील, विजय मोरखाडे उपस्थित होते.
