प्रभाग ७ व ८ मधील विविध समस्यांसाठी निवेदन






 चिखली:- प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक आणि शेतकरी बांधवांकडून गेली कित्येक वर्षापासून  विष्णू राऊत यांच्या घरापासून ते जांबवंती नदी पर्यंत काँक्रिटचा रस्ता, दोन्ही बाजूने पक्या नाल्या व नदीवर  पूल बांधणे या 

संदर्भात मागणीचे निवेदन माननीय मुख्याधिकारी नगर पालिका चिखली यांना देण्यात आले.

         सदर कामाची मागणी सातत्याने होत असतांना सुद्धा रस्ता व पूल कामाचा प्रस्ताव मे महिन्याच्या नगर पालिकेच्या मीटिंग मध्ये ठेवण्यात आलेल्या कामात समावेश असताना हे एक काम सोडून बाकी सर्व कामांना मंजुरात देण्यात आली.म्हणजे जाणीव पूर्वक हे काम का वगळण्यात आलं याची विचारणा सुद्धा यावेळी करण्यात आली.

      सदर काम झाल्यास इथे सतत होणारे अपघात थांबून नागरिक आणि शेतकऱ्यांना या समस्येतून कायमची सुटका मिळेल.असे निवेदनात म्हंटले आहे. राहुल चवरे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी साहेब यांना  हे निवेदन दिले.




 प्रभाग क्रमांक ७ व प्रभाग क्रमांक ८ मधील घनकचरा व्यवस्थापन,कीटक नाशक फवारणी संदर्भात माननीय मुख्याधिकारी साहेब नगर पालिका चिखली यांना निवेदन देऊन जनतेच्या आरोग्य संदर्भातील हे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.कीटक जन्य आजारा पासून नागरिकांना संरक्षण द्यावे,ही विनंती करण्यात आली.

Previous Post Next Post